राहुल गांधी यांच्याकडून टॅक्स वाढवण्यासंदर्भातील बातम्यांवरुन PM मोदींना घेरले, पंतप्रधानांनी 'जनतेला लुटणे सोडून आत्मनिर्भर व्हा' म्हणत साधला निशाणा
Rahul Gandhi and Narendra Modi (Photo Credits: ANI)

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  (Rahul Gandhi) यांनी पीएम मोदी (PM Modi)  यांना महागाई, बेरोजगारी, कोरोना व्हायरससह अन्य काही मुद्द्यांवरुन नेहमीच घेरले आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनी पेट्रोल-डिझेलवर टॅक्स वाढवण्यासंदर्भातील बातम्यांवरुन हल्लाबोल केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट सुद्धा केले आहे. या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी असे म्हटले आहे की, पंतप्रधानांनी जनतेला लुटणे सोडून द्या, आत्मनिर्भर बना. राहुल गांधी यांनी या ट्विटसह एका वृत्तपत्राची बातमी सुद्धा पोस्ट केली आहे.(Rahul Gandhi Attacks Modi Govt: बिहार मधील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असे वचननाम्यात जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल)

खरंतर कोरोना व्हायरसमुळे देशाची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. याच कारणास्तव देशाला आर्थिक संकटाला सामना करावा लागेल. ज्या संकटापासून सुटका मिळवण्यासाठी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवर टॅक्स वाढवण्याचा विचार करत आहे. सुत्रांच्या मते सरकारकडून दोन्ही इंधनांवर एक्ससाइज ड्युटी 3 ते 6 रुपयांचा नफा मिळू शकतो.(Bihar Assembly Elections 2020: मोदी यांनी लोकांवर आधी नोटाबंदी आणि नंतर जीएसटीची कुऱ्हाड मारली; राहुल गांधी यांची पुन्हा पंतप्रधानांवर टीका)

एका रिपोर्टनुसार, सरकारने कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या स्थिती पासून सुटका मिळवण्यासाठी आणि संसाधने वाढवण्याची तयारी करत आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साइज ड्युटीमुळे हा नफा मिळवू शकतो. यामुळे संपूर्ण आर्थिक वर्षादरम्यान, एकूण 60 हजार कोटी रुपयांची रक्कम मिळू शकते. तर सध्याच्या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास मार्च पर्यंत सरकार ही रक्कम 30 हजार कोटी पर्यंत मिळवू शकतो. तर पेट्रोल आणि डिझेलवरील टॅक्स वाढवण्यासंदर्भात एक्सपर्ट्स यांचे असे म्हणणे आहे की, टॅक्स वाढवण्याचे हिच योग्य वेळ आहे.