राहुल गांधी आणि पीएम मोदी (Photo Credit: PTI)

Bihar Assembly Elections 2020: बिहार येथे विधानसभा निवडणूकीसाठी अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांसह विविध पक्षाकडून निवडणूकीसाठी जोरदार प्रचार आणि तयारी केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी त्यांच्या निवडणूक प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी असे म्हटले की, मोदी यांनी तुमच्यावर दोन कुऱ्हाडी मारल्या आहेत. त्यात एक म्हणजे नोटाबंदी आणि दुसरी GST. आता म्हणतात की, आम्ही 19 लाख तरुणांना रोजगार देणार आहोत. गेल्या 7-8 वर्षांपासून तुम्ही काय करत होतात? गेल्या 6 महिन्यात तुम्ही काय केले? याआधी काय केले? निवडणूका आल्यातर 19 लाख तरुणांना रोजगार मिळणार.

या व्यतिरिक्त त्यांनी बिहार मध्ये बेरोजगारीचा मुद्दा उपस्थितीत करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नोटाबंदी, जीएसटी आणि कोरोना व्हायरसच्या संकट काळात लोकांना आर्थिक मदत न करता शेतकरी, लहान उद्योजक, कामगार आणि लहान उत्पादक यांची कंबर तोडली आहे. तर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह राहुल गांधी यांनी नवादा येथे आयोजिक करण्यात आलेल्या रॅलीला संबोधित करताना या सर्व गोष्टी मांडल्या आहेत.(Rahul Gandhi Attacks Modi Govt: बिहार मधील प्रत्येकाला कोरोनाची लस मोफत दिली जाणार असे वचननाम्यात जाहीर केल्यानंतर राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल)

दरम्यान, राज्यात एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. 28 ऑक्टोंबरला पहिला टप्पा, 3 नोव्हेंबरला दुसरा टप्पा आणि 7 नोव्हेंबरला तिसरा आणि अंतिम टप्प्यात मतदान पार पडणार आहे. मतदानानंतर 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.