हरियाणा येथील अंबाला एअरबेसवर आज राफेल विमानं (Rafale Fighter Aircraft) लँडींग करणार आहेत. प्रदीर्घ काळापासून चर्चेत असलेली ही लढावू विमानं अखेर भारताच्या स्वाधीन होत आहेत. हरियाणा (Haryana) राज्यातील, अंबाला एअरबेस (Ambala Air Base) येथे या विमानांचे लँडींग होणार आहेत. दरम्यान, लष्करी सुरक्षा, देशाच्या एकूणच सुरक्षा यंत्रणेत असलेले या विमानांचे महत्त्व पाहता प्रशासनाने कोणताही धोका टाळण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. त्यामुळे या विमानांची छायाचित्रे (Rafale Photo) काढण्यास, चित्रीकरण (Rafale Fighter Aircraft Video) करण्यास मनाई आहे. ही मानाई प्रसारमाध्यमांनाही लागू आहे. विमान लँडींगच्या पार्श्वभूमीवर परिसरात प्रतिबंधात्मक आणि मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश दिवसभरासाठी लागू असतील.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारतीय दंड संहिता 1973 कलम 144 अन्वये सूचीत करण्यात येते की, 29 जुलै रोजी हवाई दलाच्या अंबाला एअरबेसवर भारतीय सरकारी संपत्तीचे कोणत्याही प्रकारे चित्रीकरण अथवा छायाचित्रण करता येणार नाही. हे आदेश आज सकाळपासून सायंकाळपर्यंत लागू आहेत. (हेही वाचा, Rafale Aircraft: राफेल ची पहिली पाच लढाऊ विमाने आज भारतात येणार, अमूल ने डूडल च्या माध्यमातून केलं खास स्वागत)
दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या एका प्रतिक्रियेत म्हटले आहे की, राफेलचा अधिकृत समारंभ काही काळानंतर आयोजित केला जाईल. आज (29 जुलै) केवळ पायलट आणि ग्राऊंट क्रू यांच्यामार्फत केवळ एयरफोर्स ऑपरेशन (मोहीम) केले जाईल. याच प्रतिक्रियेत पुढे असेही म्हटले आहे की, देशाचे हित विचारात घेऊन भारतीय हवाई दल आणि केवळ क्रू (Crew) मेंबर्स या मोहिमेत सहभागी होतील. प्रसारमाध्यमांना या संपूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात येईल.
दरम्यान, लढावू विमानांसोबतच लष्करातील इतर दलांनीही सावध राहायला हवे. या मोहिमेसह लष्करातील इतर अधिकाऱ्यांनीही या मोहिमेकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही हयगय करु नये, असेही संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.