Railway Station CCTV Footage: आरपीएफ जवानाचे प्रसंगावधान, ट्रेनखाली येणाऱ्या महिलेचे थोडक्यात वाचले प्राण (पाहा व्हिडिओ)
Purulia Railway Station CCTV Footage | (Photo Credit - Twitter)

रेल्वे सुरक्षा दलातील (Railway Police Force) महिला कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका महिलेचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. पश्चिम बंगाल (West Bengal) राज्यातील पुरुलिया स्टेशन (Purulia Railway Station) फलाटावर ही घटना घडली. एक प्रवासी महिला धावत्या एक्‍सप्रेस ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न करत होती. तिचा तोल गेला आणि ती फलाटावर पडली. अचानक घडलेल्या घटनेमुळे जखमी असलेली ही महिला घाबरली. फलाटालगतच्या पठरीवरुन ट्रेन धावतच होती. क्षणाचाही विलंब लागला असता तर ही महिला प्रवासी ट्रेनखाली आली असती. मात्र, महिला कर्मचाऱ्याच्या प्रसंगावाधानामुळे या महिला प्रवाशाच्या प्राण वाचले. भारतीय रेल्वेने (Indian Railways) ही घटना आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केली आहे.

इंडियन रेल्वे ने आपल्या ट्विटर हंडलवरुन शेअर केलेला हा व्हिडिओ पुरुलिया स्टेशनवरील आहे. पुरुलीया स्टेशनवरुन धावणाऱ्या संतरागाछी-आनंद विहार एक्सप्रेस या ट्रेनमधून एक महिला प्रवासी खाली उतरण्याच्या नादात फलाटावर पडते. ती महिला प्रवासी ट्रेनखाली येणार इतक्यातच एक महिला आरपीएफ कर्मचारी धावत तिथे आली. तिने क्षणाचाही विलंब न लावता महिलेला बाहेर खेचले ज्यामुळे महिला प्रवाशाचे प्राण वाचले. (हेही वाचा, कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचे देवासारख्या धावून आलेल्या व्यक्तीने वाचवले प्राण, पहा Viral Video)

धावत्या ट्रेनमध्ये चढणे आणि उतरणे धोकादायक असल्याचे नेहमी सांगितले जाते. रेल्वेद्वारे जनजागृतीही केली जाते. अनेकदा फलाटावर उभे असलेले आरपीएफ कर्मचारी, अधिकारी अशा प्रवाशांना समज देतात. फलाटावरुन धावत्या ट्रेनमध्ये चढू किंवा उतरु नका असे सांगतात. परंतू, अनेकदा प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे असे करणे त्यांच्या जीवावरही बेतते. अनेकदा ते गंभीर जखमी होतात.