कल्याण रेल्वे स्थानकात चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचे देवासारख्या धावून आलेल्या व्यक्तीने वाचवले प्राण, पहा Viral Video
Kalyan Station (Photo Credits-Twitter)

Viral Video: मुंबईत चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना किंवा चढताना तोल जाऊन खाली पडल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामध्ये काही जणांचे नशीब ऐवढे बलवत्तर की, त्यांचा जीव वाचवण्यासाठी देवासारखा एखादा व्यक्ती धावून येतो. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यानुसार मुंबईतील कल्याण स्थानकात चालत्या ट्रेनमधून खाली उतरताना एका व्यक्ती प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मध्ये अडकला गेला. त्याचवेळी एका पॉइंटमॅनची नजर त्याच्यावर पडते आणि तो त्याला वाचवण्यासाठी धावत जातो. यामुळे आता त्या पॉइंटमॅनचे कौतुक केले जात आहे.

सेंट्रल रेल्वने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक कॅप्शन देत असे म्हटले की, कल्याण स्थानकात पॉइंटमॅनने एका प्रवाशी नागरिकाचा जीव वाचवला आहे. ही घटना 14 नोव्हेंबरची आहे. पॉइंटमॅन श्री शिवाजी सिंह यांनी एका प्रवाशाला प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनच्या मध्ये पडल्याचे पाहिले. त्यावेळी तातडीने त्याचा जीव वाचवला.(Viral Video: दुचाकी स्वाराची बाईक थेट साडीच्या दुकानात, पाहा व्हिडिओ)

Tweet:

व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसून येत आहे की, एक ट्रेन प्लॅटफॉर्मवरुन रवाना होत आहे. तेव्हाच अचानक चालत्या ट्रेनमधून एक व्यक्ती उतरण्याचा प्रयत्न करतो. चालत्या ट्रेनमधून उतरत्या वेळी त्याचे संतुलन बिघडले आणि तो प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडला.