Strict Ban on Tobacco Products in Jagannath Temple: तुम्हाला जर पान, गुटखा, तंबाखू अथवा तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याची सवय असेल तर तुम्हाला पुर येथील जगन्नाथ मंदिरात प्रवेश करता येणार नाही. येत्या 1 जानेवारी 2024 पासून हा नियम लागू होणार आहे. पुरी येथील जगन्नाथ मंदिरा प्रशासनाने त्यांच्या पवित्र भूमीवर स्वच्छ आणि अधिक शिस्तबद्ध वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने निर्णायक पाऊल उचलले आहे. मुख्य प्रशासक रंजन कुमार दास यांच्या नेतृत्वाखालील समितीची एक बैठक नुकतीच पार पडली. 1 जानेवारी 2024 पासून 'पान' आणि 'गुटखा' यासह तंबाखू-संबंधित उत्पादनांच्या सेवनावर मंदिरात सर्वंकष बंदी अधिकृतपणे घोषित केली आहे.
दरम्यान, मंदिर प्रशासनाने देवस्थानचे पावित्र्य वाढविण्याच्या उद्देशाने अनेक उपाययोजनांचे अनुसरण करण्याचे ठरवले आहे. याचाच एक भाग म्हणून जगन्नाथ मंदिर प्रशासाने ड्रेस कोडही निश्चित केला असून, त्यावर त्याच्या पालनावर अधिक भर दिला आहे. रंजन कुमार दास यांनी भर देत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बंदी कठोरपणे अंमलात आणली जाईल. भक्त, सेवक आणि मंदिर कर्मचार्यांना याबाबत सूचना दिली जाईल. तसेच वेळोवेली मार्गदर्शनही केले जाईल. मंगळवारी पत्रकार परिषदेत, त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये नियोजित आगामी जनजागृती मोहिमेची रूपरेषा दिली. ज्यामुळे नवीन वर्षात बंदी लागू करण्याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला. नियमांचे पालन केल्याबद्दल दंड आकारण्याची तरतूदही करण्यात आली आहे.
जगन्नाथ मंदिरात विशिष्ट ड्रेसकोडचा निर्णय या आधीच जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, भाविकांना हाफ-प्लांट, शॉर्ट्स, फाटलेल्या जीन्स, स्कर्ट किंवा स्लीव्हलेस कपडे घातले असल्यास त्यांना प्रवेश नाकारला जाईल. मंदिराची सजावट आणि आदर राखण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला भक्तांसाठी गणवेश अनिवार्य करण्याच्या निर्णयावर पुन्हा एकदा समाजातून टीका होण्याची शक्यता आहे.