Odisha Crime: ओडिशामधील श्री जगन्नाथ मंदिरात 12 वर्षीय मुलीचा विनयभंग, प्रकरणी पुजाऱ्याला अटक
Rape in Lockup | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

ओडिशाच्या (Odisha) पुरी शहरातील श्री जगन्नाथ मंदिराच्या (Shri Jagannath temple) आवारात 12 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करण्यात आली आहे. या प्रकरणी एका पुजाऱ्याला (Priest) शनिवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हैदराबादची (Hyderabad) 12 वर्षाची मुलगी देवळाच्या आवारातील एका छोट्या मंदिरात प्रार्थना करत असताना ही घटना घडली. ती बामना मंदिरात (Bamna Temple) एकटी होती तर तिचे पालक मुख्य मंदिरात होते. श्री जगन्नाथ मंदिराच्या आवारात 136 लहान मंदिरे आहेत. तिच्या आई -वडिलांनी सिंहद्वार पोलिस स्टेशनमध्ये (Sinhadwar Police Station) दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ती रडत रडत बामना मंदिराबाहेर धावली आणि तिने आपल्या आईला घडलेला प्रसंग सांगितला.

तक्रारीच्या आधारे, पुजारीला शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले आणि एका दिवसात अटक करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची माहिती मुख्य कल्याण समितीलाही दिली आहे. दंडाधिकाऱ्यांसमोर मुलीचे बयान नोंदवण्यात आले असून आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जात आहे, असे पोलीस अधीक्षक के.व्ही. यांनी सांगितले. हेही वाचा Karnataka Ganagrape: धक्कादायक! शाळेत चाललेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 5 जणांविरोधात गुन्हा दाखल, दोघांना अटक

या प्रकरणी पोलिसांनी संग्राम दाश याला शनिवारी अटक केली आहे. एका दिवसानंतर त्यावर लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.पुरीचे पोलीस अधीक्षक (SP) कंवर विशाल सिंह म्हणाले की पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले. सिंह म्हणाले, सर्व आवश्यक कायदेशीर कारवाई तातडीने करण्यात आली. या घटनेची तीव्र दखल घेत पुरी बाल कल्याण समितीने (CWC) जिल्हा प्रशासन आणि मंदिर संस्थेला मंदिर परिसरात महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी पावले उचलण्यासाठी पत्र लिहिले आहे.