Punjab Congress Crisis: अमरिंदर सिंह मुख्यमंत्री, नवजोत सिंह सिद्धू प्रदेशाध्यक्ष; पंजाब काँग्रेसमधील तिढा सुटण्याची चिन्हे- सूत्र
Punjab Congress | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंजाब काँग्रेसमध्ये (Punjab Congress) निर्माण झालेला तिढा सुटण्याची चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) आणि क्रिकेटमधून राजकारणात आलेले नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस हायकमांडने यावर वेळीच लक्ष देऊन मध्यस्थीचा मार्ग काढला आहे. त्यानुसार कॅप्टन अमरिंदर सिंह यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद देण्याचे तर अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदावर ठेवले जाण्याची चिन्हे आहेत. पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कलहावर पडदा पडल्याचेही सूत्रांनी गुरुवारी (15 जुलै) सांगितले.

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होत आहेत. तत्पूर्वी पक्षाने अंतर्गत कलहावर तोडगा काढल्याचे समजते. नवजोत सिंह सिद्धू आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्यात पाठीमागील प्रदीर्घ काळापासून पक्षांतर्गत लढाई सुरु होती. त्यानंतर या वादावर आता पडदा टाकण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जर पंजाब काँग्रेसमध्ये फेरबदल झाले तर सिद्धू हे सुनील जाखड यांची जागा घेतील. याशिवाय इतर दोन नेत्यांनाही पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर नेमले जाण्याची शक्यता आहे. यात एक दलीत चेहरा आणि दुसरा हिंदू चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे आपल्या मंत्रिमंडळातही फेरबदल करतील. यात चरणजीत चन्नी आणि गुरप्रीत कांगर यांसारख्या मंत्र्यांना हटवून नव्या चेहऱ्यांना संंधी दिली जाऊ शकते. यात विधानसभा अध्यक्ष राणा केपी सिंह, आमदार राज कुमार वेरका यांच्याशिवाय दलित समूहातून एखादा चेहरा घेतला जाऊ शकतो. (हेही वाचा, Punjab Congress Politics: पंजाब काँग्रेसमध्ये घमासान, मुख्यमंत्री पदावर Captain Amarinder Singh, नवजोत सिंह सिद्धू यांना मोठ्या संधीची शक्यता कमीच-सूत्र)

एएनआय ट्विट

देशात काँग्रेस सत्तेत असलेल्या मोजक्या राज्यांपैकी पंजाब एक आहे. याच काँग्रेसमध्ये पाठिमागील काही दिवसांपासून अंतर्गत कलह (Punjab Congress Politics) वाढू लागले होता. त्यातून पंजाब काँग्रेस दोन गटांमध्ये विभागली गेली. केंद्रीय नेतृत्वाने वेळीच दखल घेत परिस्थीती नियंत्रणासाठी तीन सदस्यांची एक कमेटी पंजाबमध्ये पाठवली. या कमेटीने आपला अहवाल हंगामी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांन दिला. मल्लिकार्जुन खडगे, जेपी अग्रवाल आणि हरीश रावत या तीन ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी हा अहवाल तयार केला. सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले होते की, चार पानांच्या या अहवालामध्ये पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्या कार्यशैलीबद्दल अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. परंतू त्यांच्याविरोधात बंडखोरी होण्याची कोणतीही शक्यता नाही.