काँग्रेस (Congress) नेतृत्व पंजाब (Punjab) काँग्रेसमध्ये मोठा पक्षांतर्गत बदल करण्याच्या विचारात आहे. मुख्यमत्री पदावरुन कॅप्टन अमरिंदर सिंह यांना हटविल्यानंतर त्याची एक झलक पाहायला मिळालीच. आता पुढच्या वर्षी होणारी विधानसभा निवडणूक 2022 (Punjab Assembly elections 2022) काँग्रेस कॅप्टनच्या नेतृत्वाशिवाय लढणार आहे. पंजाब काँग्रेस (Punjab congress) पक्ष प्रभारी हरीश रावत (Harish Rawat) यांनी तशी माहिती दिली आहे. हरीश रावत यांनी वृत्तसंस्था ANI सोबत बोलताना सांगितले की, विधानसभा निवडणूक 2022 मध्ये काँग्रेस कोणाच्या चेहऱ्याखाली निवडणूक लढवेल हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. परंतू, आजघडीला पाहिले तर पंजाबमध्ये नवजोत सिंह सिद्धू (Navjot Singh Sidhu) अधिक लोकप्रिय आहेत. रावत यांनी पुढे बोलताना सांगितले की, चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय सर्व सहमतीने घेण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस आगामी विधानसभा निवडणूक सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
हरीश रावत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर मुख्यमंत्री पदासाठी सहमती झाली होती. आमचा प्रयत्न आहे की, चरणजीत सिंह चन्नी यांच्या शपथविधी सोहळ्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंह उपस्थित राहतील असा आमचा प्रयत्न आहे. मात्र, शपथविधीस उभे राहायचे किंवा नाही हे त्यांनीच ठरवायचे आहे. रावत यांनी म्हटले की, दोन उपमुख्यमंत्र्यांचे नाव अजून निश्चित व्हायचे आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रावत यांनी म्हटले की, राज्यपाल बनवारी लाल पुरोहित यांच्याशी मुलाखतीनंतर आपला रोख निश्चित करत पंजाबचे पुढचे मुख्यमंत्री सीएम चन्नी यांनी म्हटले की, आम्ही पक्षाच्या आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र राज्यपालांना दिला आहे. (हेही वाचा, New CM of Punjab: अमरिंदर सिंग यांच्यानंतर चरणजित सिंह चन्नी सांभाळणार पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी)
चरणजीत सिंह चन्नी यांनी कैप्टन अमरिंदर सिंह (Amarinder Singh) यांची जागा घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांच्याशी झालेल्या प्रदीर्घ मतभेदानंतर अमरिंदर सिंह यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. पुढच्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या काहीच काळ हा बदल काँग्रेसने केला आहे.