पुणे लक्ष्मी रोड (File Image)

Pune Traffic Diversions For Diwali 2024: येत्या 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीपासून दिवाळी (Diwali 2024) सणाला सुरुवात होत आहे. उत्साह आणि जल्लोषाचा हा सण साजरा करण्याची तयारी आता सुरू झाली आहे. घरात फराळ बनतोय, तर खरेदीसाठी बाजार गजबजले आहेत. पुण्यात लक्ष्मी रोड आणि तुळशीबाग ही ठिकाणे खरेदीसाठी सर्वात लोकप्रिय आहेत. सध्याच्या दिवाळीच्या दिवसांत या ठिकाणी मोठी गर्दी दिसून येत आहे. दिवाळी सणापूर्वी कपडे, दागिने, सजावटीच्या वस्तू आणि इतर अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी पुण्यातील लोक शहराच्या या मध्यवर्ती भागांत जात आहेत. त्यामुळे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पुणे शहर वाहतूक पोलिसांनी (Pune Traffic police) वाहतूक वळवण्याची आणि पार्किंग व्यवस्था जाहीर केली आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूकीत अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन आवश्यकतेनुसार, 21 ऑक्टोबर 2024 ते 5 नोव्हेंबर 2024 दरम्यान, खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहेत-

> शिवाजीनगर वरून शिवाजी रोडने जाणारी चारचाकी वाहने स.गो बर्वे चौकामधून वळविण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग जंगली महाराज रोडने टिळक चौक मार्गे इच्छीतस्थळी जातील.

> स्वारगेटवरून बाजीराव रोडने शिवाजीनगरकडे पुरम चौक मार्गे जाणारी चारचाकी वाहने पुरम चौकामधुन डावीकडे वळुन टिळक रोडने- एस. पी. कॉलेज- अलका चौक मागे इच्छीतस्थळी जातील.

> आप्पा बळवंत चौकातुन बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल.

पर्यायी मार्ग- बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

> फुटका बुरूज वरून जोगेश्वरी चौकाकडे येणारी वाहतुक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल पर्यायी मार्ग- शिवाजी रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील. (हेही वाचा: Pune Bhimthadi Jatra: पुण्यात यंदा 20 ते 25 डिसेंबर दरम्यान लोकप्रिय भीमथडी जत्रेचे आयोजन; खरेदीसह घेता येणार ग्रामीण भागातील पदार्थांचा आस्वाद)

> शनिपार चौकाकडून मंडईकडे जाणारी वाहतूक व कुमठेकर रोडवरून मंडईकडे जाणारी वाहतुक आवश्यकतेनुसार बंद करण्यात येईल

पर्यायी मार्ग- बाजीराव रोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जातील.

पार्किंग-

बाजीराव रोड, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व मंडई या भागामध्ये खरेदीकरीता येणाऱ्या नागरिकांनी त्यांची वाहने बाबु गेणु पार्किंग, मिसाळ पार्किंग, हमालवाडा पार्किंग व साने वाहनतळ याठिकाणी पार्क करावीत.