नोकरी वरून काढून टाकल्याच्या रागात 2 व्यक्तींनी दुकान जाळल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना पुण्यातील उरूळी कांचन भागातील आहे. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सनुसार, आरोपींची नावं ओंकार गायकवाड आणि अनिकेत मोटे आहेत. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये स्वप्नील कांचन या व्यक्तीने पोलिसांमध्ये फिर्याद नोंदवली आहे. सध्या पुणे पोलिस लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये तपास करत आहेत.
आरोपी ओंकार गायकवाड आणि अनिकेत मोटे हे स्वप्नीलच्या दुकानामध्ये काम करत होते. काही दिवसांपूर्वी स्वप्नीलने त्यांना कामावरून काढून टाकले. हाच राग मनात ठेवून त्यांनी स्वप्नीलचं सारं दुकान जाळल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. या अग्नितांडवामध्ये दुकानातील 50 लाख रूपयांचं फर्निचर जळले आहे. हे देखील नक्की वाचा: फक्त 'बोअर' होत आहे म्हणून तरुणाने सोडली 3.5 कोटींची नोकरी, जाणून घ्या सविस्तर.
मागील काही दिवसांत अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.कामावरून काढलं म्हणून तरुणाने लेडीज टेलरिंगचे दुकान चालविणाऱ्या महिलेवर पेट्रोल ओतून तिला जाळल्याची घटना देखील समोर आली आहे. महिलेला दुकानात जाळण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपी तरुणही आगीत होरपळून गंभीर जखमी झाला. यामध्ये आरोपी तरूण आणि महिला दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.