Pulwama Terror Attack: गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शहीद जवानांना श्रद्धांजली,खांद्यावर भार घेत दिला अखेरचा निरोप
Pulwama Terror Attack: गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शहीद जवानांना श्रद्धांजली,खांद्यावर भार घेत दिला शेवटचा निरोप (फोटो सौजन्य-ANI)

Pulwama Terror Attack: जम्मू -काश्मीर (Jammu-Kashmir) येथील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. तसेच या हल्ल्याच्या निषेध म्हणून ठिकठिकाणी पाकिस्तान विरोधात घोषणाही केल्या जात आहे. परंतु हल्ल्यामध्ये वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जवानाच्या पार्थिवाचा भार आपल्या खांद्यावर स्विकारत अखेरचा निरोप दिला आहे.

अवंतीपुरा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव बडगाम येथील सीआरपीएफच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी सर्व जवानांनमध्ये अश्रूच्या धारा वाहत असलेल्या दिसून आल्या. पण त्याचसोबत वीर जवान अमर रहे या घोषणा देत वीरजवानांना अखेरची सलामी देण्यात आली. यावेळी जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलाबाग सिंह यांनी ही वीरपुत्राला खांदा देत अखेरचा निरोप दिला.(हेही वाचा-Pulwama Terror Attack: 'भारत के वीर' या अॅप किंवा वेबसाईटवरुन शहीदांच्या कुटुंबियांना अशी करा आर्थिक मदत)

राजनाथ सिंह यांनी आज श्रीनगर येथे पोहचून शहीद जवानांना मानवंदना दिली आहे. त्यावेळी राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कमांडर लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंह यांनी ही दुख व्यक्त करत सीआरपीएफच्या जवानांना श्रद्धांजली अर्पित केली आहे. तसेच तमिळनाडू मुख्यमंत्री इडापड्डी के. पलानीस्वामी यांनी शहीद जवानांच्या परिवाराला 20 लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे.