राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे (Rashtriya Rajput Karni Sena) अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी (Sukhdev Singh Gogamedi) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. गोगामेडी येथे हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेच्या वेळी गोगामेडी घरातच होते. दरम्यान या घटनेनंतर जयपूरमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली.
पाहा पोस्ट -
VIDEO | People stage protest in Jaipur over murder of Rashtriya Rajput Karni Sena president Sukhdev Singh Gogamedi.
Gogamedi was shot dead in the living room of his house in Jaipur on Tuesday by three men. pic.twitter.com/GQhM0nMhH0
— Press Trust of India (@PTI_News) December 6, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)