Delhi | Twitter

दिल्लीमध्ये जी 20 ची तयारी जोरात सुरू आहे. येत्या 9-10 सप्टेंबर दिवशी दिल्लीत जगातील अनेक प्रमुख नेते दाखल होणार आहे. पण या धामधुमीमध्ये पश्चिम दिल्ली भागात अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशन वर भिंतींवर खलिस्तान समर्थक स्लोगन स्प्रे केलेली दिसून आली आहेत. यामध्ये 'दिल्ली बनेगा खलिस्तान' आणि 'खलिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिसल्या आहेत.. पोलिसांकडून सध्या या स्प्रे केलेल्या घोषणा पुसण्याचं काम सुरू आहे. पश्चिम दिल्ली मध्ये पंजाबी बाग, शिवाजी पार्क, मादीपूर, पश्चिम विहार, उद्योग नगर आणि महाराजा सूरजमल स्टेडियमवर हे मेसेज स्प्रे केलेले आहेत. दरम्या या प्रकरणी  पोलिसांनी कलम १५३ अ, कलम ५०५ आणि बदनामी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती राम गोपाल नाईक, डीसीपी मेट्रो यांनी दिली आहे. G20 summit च्या पार्श्वभूमीवर दिल्लीत 8-10 सप्टेंबर दरम्यान बंद राहणार शाळा, सरकारी कार्यालयं .

पहा शिवाजी पार्क मेट्रो स्टेशन वरील दृष्य

सप्टेंबर महिन्यात दिल्लीत अनेक देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीमुळे गैरसोय होत असली तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लोकांना G-20 शिखर परिषद यशस्वी करण्यासाठी मदत करण्याचे आवाहन नुकतेच केले आहे. दक्षिण आफ्रिका आणि ग्रीस या दोन देशांचा दौरा करून मोदी शनिवारी दिल्लीत परतले. विमानतळावर उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, संपूर्ण देश G-20 परिषदेचे यजमान आहे, पण पाहुणे दिल्लीत येत आहेत. हे शिखर संमेलन यशस्वी करण्याची विशेष जबाबदारी दिल्लीतील जनतेची आहे. देशाच्या प्रतिष्ठेला किंचितही धक्का लागणार नाही याची काळजी त्याला घ्यावी लागेल.