पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून Brazil President Jair Bolsonaro यांना कोविड 19 वर मात करण्यासाठी शुभेच्छ!
File Image Of PM Narendra Modi and Jair Bolsonaro

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (8 जुलै) ट्वीट करत ब्राझीलचे प्रेसिड्न्ट Jair Bolsonaro यांना कोरोना व्हायरस वर लवकरात लवकर मात करण्यासाठी ट्वीटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदींनी हा मेसेज इंग्रजी सोबतच ब्राझीलमधील पोर्तुगीज भाषेमध्येही ट्वीट केला आहे. दरम्यान Bolsonaro हे काल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं वृत्त समोर आलं आहे. दिवसागणिक ब्राझीलमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

ब्राझिलचे अध्यक्ष यांनी ते कोरोनावरा मात करतील याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्यावर hydroxychloroquine या अ‍ॅन्टी मलेरिया ड्रग्जद्वारा उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी ताप, अंगदुखी जाणवल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसाचा एक्स रे काढण्यात आला. त्यानंतर त्यांची कोरोना टेस्ट देखील पॉझिटिव्ह आली. सीएनएनच्या लाईव्ह मुलाखतीमध्येच त्यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.

PM Modi याच्या शुभेच्छा 

8 एप्रिल 2020 दिवशी यंदाच्या हनुमान जयंतीला Jair Bolsonaro यांनी रामायणातील खास दाखला देत जसा हनुमानाने लक्ष्मणाच्या उपचारासाठी संजिवनीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, प्रभू येशूंनी आजाराची लोकांची मदत केली होती त्याप्रमाणेच आता कोरोना व्हायरसच्या या संकटात भारत आणि ब्राझील ने एकमेकांना साथ द्यायला हवी. यामुळे कोरोनाच्या संकटावर मात करता येईल. लोकांच्या मदतीने चांगले आशीर्वाद घेऊन आपण हा आजार संपवू शकतो. अशा विश्वास त्यांनी नरेंद्र मोदींना लिहलेल्या पत्रामध्ये केला होता. ब्राझील राष्ट्राध्यक्ष Jair Bolsonaro यांनी Hydroxychloroquine च्या मदतीसाठी मानले PM Narendra Modi यांचे आभार!

दरम्यान मागील काही दिवसांपासून ब्राझील मधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवरून ते परिस्थिती नीट हाताळत नसल्याचं सांगत टीका होत आहे. Jair Bolsonaro यांना कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग, क्वारंटीन हे प्रभावी नसल्याचं वाटत आहे. त्यांनी हे उघडपणे बोलून दाखवल्यानंतरही त्यांच्यावर टीका झाली होती.