Coronavirus वरील उपचारासाठी ब्राझीलच्या राष्ट्रपतींची रामायणातील 'या' प्रसंगाचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधाची मागणी
Jair Bolsonaro (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) उपचारासाठी आता ब्राझीलने (Brazil) सुद्धा भारताकडे औषधांची मागणी केली आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो (Jair Bolsonaro) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून ही औषधांची मागणी केली. हे पत्र लिहिताना बोलसोनारो यांनी खास रामायणातील (Ramayan) एका खास प्रसंगाचा दाखला दिला आहे. ज्या प्रमाणे रामायणात हनुमानाने (Hanuman)  लक्ष्मणाच्या उपचारासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता, प्रभू येशूंनी आजाराची लोकांची मदत केली होती त्याप्रमाणेच आता कोरोनाच्या या संकटकाळात भारत आणि ब्राझील ने एकमेकांना साथ द्यायला हवी. यामुळेच या संकटावर मात करता येईल. लोकांच्या मदतीने चांगले आशीर्वाद घेऊन आपण हा आजार संपवू शकतो असे जैर बोलसोनारोयांनी पत्रात म्हंटले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या सहित 30 हुन अधिक देशांनी भारताकडे कोरोनावरील उपचारासाठी Hydroxychloroquine या औषधाची मागणी केली होती, याच पार्श्वभूमीवर आता ब्राझीलने सुद्धा मदतीची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी भारत सरकारला इशारा देत कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन चा पुरवठा करण्याची मागणी केली होती.भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी उठवली नाही तर अमेरिका या विरोधात कारवाई करेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला होता, यानंतर भारत सरकारने कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन सहित अन्य 24 औषधांवरील निर्बंध हटवले होते. तसेच गर्जे असणाऱ्या देशांना औषधे पुरवण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. यानुसार आता भारत ब्राझील ला मदत करू शकते. दोन्ही देशातील परिस्थितीवर मोदी आणि बोलसोनारो यांच्यात रविवारी चर्चा झाली होती.

सद्य घडीला भारत आणि ब्राझील दोन्ही देशाला कोरोनाचा फटका बसत आहे. भारतात सध्या 5194 कोरोना प्रकरणे आहेत आणि 149 मृत्यू झाले आहेत, तर ब्राझील मध्ये 14,000 रुग्ण आहेत आणि 127 मृत्यू झाले आहेत.