Narendra Modi | (Photo Credits: Twitter )

सीएए (CAA), एनआरसी (NRC) समर्थकन-विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला राजधानी दिल्ली येथे हिंसक वळण लागले. गेल्या चार दिवसात दिल्ली शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये हिंसाचार झाला. या हिंसाचारावर विविध क्षेत्र आणि प्रसारमाध्यमांतून टीका झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी अखेर ट्विटद्वारे आपले मौन सोडले आहेत. पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, दिल्लीत उद्भवलेल्या परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि इतर यंत्रणा प्रयत्नशील आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दिल्लीदील नागरिकांना शांतता, सहकार्य आणि परस्परांतील बंधुभाव कायम राहावा अशा भावनाही पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारावरुन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. भाजपचे नेते नकारात्मक भाषा बोलत राहिले आणि सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काहीच केले नाही, अशी टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. दिल्लीत हिंसाचार घडत असताना गृहमंत्री अमित शाह कोठे होते? असा सवाल उपस्थित करत सोनिया गांधी यांनी अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशीही मागनी सोनिया गांधी यांनी केली आहे. (होही वाचा, Delhi Violence: NSA अजीत डोभाल यांना दिल्ली हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्याची जबाबदारी, सरकारचा निर्णय)

पंतप्रधान मोदी ट्वि

प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील हिंसाचारात आजपर्यंत 20 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. समाजकंठकांना पायबंध करण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि पोलिसांनी कारवाई सुरु केल्यानंतरही दिल्लीतील काही ठिकाणी पुन्हा हिंसा भडकली. सध्यास्थितीत राजधानीत चार दिवसांसाठी कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच जमावबंधीचे आदेशही देण्यात आले आहेत.