Rashtriya Swachhata Kendra: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वच्छता केंद्र चे उद्घाटन करणार; 'या' केंद्राची वैशिष्ट्य जाणुन घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: IANS)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज स्वच्छ भारत मिशन (Swachha Bharat Mission) वरील संवादात्मक अनुभव केंद्र राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे (Rashtriya Swachhata Kendra) उद्घाटन करतील. गांधीजींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी उत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधानांनी 10 एप्रिल 2017 रोजी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा मोदींकडुन करण्यात आली होती. यानिमित्ताने आज मोदी दिल्ली मध्ये गांधी नगत राजघाट येथे स्वच्छता केंद्रात 36 शाळकरी विद्यार्थ्यांशी संंवाद सुद्धा साधणार आहेत. हे विद्यार्थी सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करतील. हा कार्यक्रम दिल्ली येथील राष्ट्रीय स्वच्छता केंद्रात संध्याकाळी 4 वाजता सुरु होणार असुन 4 वाजुन 45 मिनिटांनी या केंद्राची उद्घाटन होईल. हा कार्यक्रम पंतप्रधान कार्यालयाच्या (PMO Twitter Account) वर पाहायला मिळेल. तुर्तास या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची वैशिष्ट्य काय आहेत हे जाणुन घ्या.

राष्ट्रीय स्वच्छता केंद्रात एका सभागृहात भेट देणार्‍यांसाठी 360 अंशाचा ऑडिओ व्हिज्युअल इमर्सिव्ह शो आयोजित केला जाईल, यात भारताच्या स्वच्छता मोहिमेची माहिती दिली जाईल,स्वच्छ भारत मिशनने देशातील ग्रामीण स्वच्छतेत बदल घडवून आणला आहे आणि 55 कोटीहून अधिक लोकांना शौचालय उपलब्ध करुन दिले आहेत. वर्तणुकीत बदल घडवुन आणलेला हा सर्वात मोठा प्रकल्प ठरला आहे आणि याविषयी अधिक पिढ्यांना माहिती मिळावी या हेतुने या केंद्रात सोय केलेली आहे. यासोबतच केंद्रातील उद्यानात कचरा विघटना पासुन ते स्वच्छता विषयी प्रात्यक्षिक दाखवुन जागृती केली जाईल.

नरेंद्र मोदी ट्विट

स्वच्छ भारत मिशन हा नरेंद्र मोदी यांंच्या सरकारमधील एक गाजलेला आणि जागतिक स्तरावर कौतुक प्राप्त केलेला उपक्रम आहे. या उपक्रमातुन महात्मा गांधी यांंच्या स्वच्छ भारत स्वप्नाची पुर्ती करण्याचा प्रयत्न होत आहे आणि यात इतरांंना समाविष्ट करून या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी हे राष्ट्रीय स्वच्छता केंद्र फायदेशीर ठरेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे.