Mary Millben and PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लोकप्रिय अमेरिकन गायिका मेरी मिलबेन (American singer Mary Millben) हिने वॉशिंग्टन डीसी (Washington DC) येथील रोनाल्ड रीगन (Ronald Reagan Center) सेंटरमध्ये आपल्या परफॉर्मन्सनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नमस्कार करत चरणस्पर्श केला. ही घटना पाहून उपस्थितांना काहीसा धक्का बसला. दरम्यान, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जमावातील अनेकांनी 'भारत माता की जय' अशा घोषणा दिल्या. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

मेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदी आणि भारतीय डायस्पोरा यांच्या उपस्थितीत भारताचे राष्ट्रगीत गायले. त्यानंतर तिने भारतीय पंतप्रधानांचे ‘नमस्ते’ करून स्वागत केले आणि आदराने त्यांच्या पायाला स्पर्श केला. दरम्यान, दोन्ही मान्यवरांनी ‘भारत माता की जय’च्या गजरात अल्पसा संवादही केला. हा कार्यक्रम युनायटेड स्टेट्स इंडियन कम्युनिटी फाउंडेशन (USICF) ने आयोजित केला होता. ज्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतीय डायस्पोरांना त्यांचे निरोपाचे भाषण केले. (हेही वाचा, PM Modi Egypt Visit: युनायटेड स्टेट्सचा पहिला राज्य दौरा आटोपला; पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्त येथे रवाना)

व्हिडिओ

ओक्लाहोमा शहरात जन्मलेल्या मेरी मिलबेनने यांनी रोनाल्ड रेगन सेंटरमध्ये भारतीय राष्ट्रगीताचे भावपूर्ण सादरीकरण केले.त्यांच्या परफॉर्मन्सपूर्वी, अमेरिकन गायिकेने ट्विट केले होते की, 'मी शेवटी विश्रांती घेईन, मी जे काही केले ते खूप महत्त्वाचे आहे कारण त्याने (देवाने) माझ्याद्वारे केले आहे. आज रात्री मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रतिष्ठित पाहुणे, भारत आणि जगभरातील भारतीय समुदायांसाठी भारतीय राष्ट्रगीत सादर करत असताना, तुम्ही माझ्या हृदयात आणि विचारांमध्ये आहात'. मेरी मिलबेनने यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले की, आम्ही कुटुंब आहोत - 'एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. जयहिंद आणि देव US-India युतीला आशीर्वाद लाभो.

ट्विट

ट्विट

मेरी मिलबेनने 21 जून 2023 रोजी संयुक्त राष्ट्रांमध्ये आयोजित केलेल्या 9व्या आंतरराष्ट्रीय योग दिनामध्ये देखील भाग घेतला होता. तिने 'ओम जय जगदीश' हे हिंदू भक्तिगीत गायल्यानंतर तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिचा मोठा चाहता वर्ग आहे