राजकारणात स्वत: ला पूर्णपणे झोकून देणारे मातब्बर, हुशार व्यक्तिमत्व असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आज 79 व्या वाढदिवसानिमित्त सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शरद पवार (Sharad Pawar) हे जितके लोकांच्या जवळचे आहेत तितकेच घट्ट नाते त्यांच्या राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांसोबत आहे. त्यामुळे सामान्य जनता, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि अनेक धुरंधर राजकीय नेते त्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा देत आहेत. मग यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कसे बरे मागे राहतील. महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात स्वत: ची ओळख निर्माण केलेल्या शरद पवारांना नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मिडियावर नेहमीच सक्रिया असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून विशेष शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट:
Greetings to Shri Sharad Pawar Ji on his birthday. Praying for his long and healthy life. @PawarSpeaks
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2019
शरद पवार न केवळ राजकारणात आले त्यांच्यापाठोपाठ त्यांची मुलगी सुप्रिया सुळे, पुतणे अजित पवार देखील ओघाओघाने राजकारणात आले. त्यामुळे त्यांच्या घराण्याला महाराष्ट्राच्या राजकारणाचा वारसा मिळाला असं म्हणायला हरकत नाही. शरद पवारांशी सांगू तेवढ्या गोष्टी कमीच आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत आणि सत्तासंघर्षात त्यांचा राजकारणातील दांडगा अनुभव आणि त्याची चाणक्यनीती आपल्या सर्वांनाच पाहायला मिळाली.