आज (24 एप्रिल) दिवशी पंचायत राज दिवसाचं औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील सरपंचांसोबत खास व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारा संवाद साधणार आहेत. सकाळी 11 च्या सुमारास या कार्यक्रमाला सुरूवात होईल अशी माहिती देण्यात आली आहे. सार्या सरपंचांना सोशल डिस्टन्स्टिंगचं पालन करत दूरदर्शनच्या माध्यमातून सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. National Panchayati Raj Day: पंचायत राज दिन- ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असा चालतो काभार; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व.
दरवर्षी 24 एप्रिल दिवशी पंचायत राज दिवस साजरा केला जातो. यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे देशामध्ये कडक संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे आता video-conferencing च्या माध्यमातून सरपंच आणि पंतप्रधानांची भेट होणार आहे. दरम्यान आजच्या दिवसाचं औचित्य साधत narendramodi.in या पंतप्रधानांच्या वेबसाईटवरील माहितीनुसार e-GramSwaraj Portal आणि Mobile App लॉन्च केलं जाणार आहे.
नरेंद्र मोदी यांचं ट्वीट
At 11 AM today, PM @narendramodi would be interacting with Sarpanchs from across the nation via video conferencing. All Sarpanchs will be able to join this interaction through Doordarshan, from their respective homes adhering to social distancing norms.
— PMO India (@PMOIndia) April 24, 2020
नवं युनिफाईड पोर्टल हे Ministry of Panchayati Raj चा नवा प्रयत्न आहे. यामध्ये ग्राम पंचायतींना ग्राम पंचायतीचा विकास आराखडा बनवण्यासाठी आणि तो राबवण्यासाठी खास यंत्रणा मिळणार आहे.