पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा राज्यातील COVID19 च्या परिस्थितीबद्दल व्यक्त केली चिंता, आरोग्य सुविधेवर अधिक भर देण्याचा सल्ला
Prime Minister Narendra Modi virtually interacting with the CMs of six states on Friday. [Photo/ANI]

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी 6 राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा केली. व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओडिशा आणि केरळचे मुख्यमंत्री उपस्थितीत होते. मोदी यांनी असे म्हटले की, आपल्याला टेस्ट, ट्रॅक आणि ट्रिट आणि लसीकरणावर जोर द्यावा लागणार आहे. ज्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यांनी अधिक सावधगिरी बाळगत तिसरी लाट थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत.

मोदी यांनी सुरुवातीला असे म्हटले की, जेव्हा कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली होती तेव्हा स्थिती सुरुवातीला नियंत्रात होती. पण महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णांचा आकडा अधिक वाढल्याचे दिसून आले होते. ही बाब देशासाठी अधिक गंभीर आणि चिंतेसारखी आहे. देशात कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 80 टक्के हे या देशातील असून याबद्दलच मोदी यांनी चर्चा केली.(दिलासादायक! आयटी कंपनी Infosys देणार तब्बल 35,000 फ्रेशर्सना नोकऱ्या; Q1 मध्ये झाला 5195 कोटींचा नफा)

मोदी यांनी पुढे असे म्हटले की, एक्सपर्ट्स असे म्हणतात की दीर्घकाळ रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास कोरोनाच्या दुप्पटीचा सुद्धा आकडा वाढू शकतो. नव्या व्हायरसचा धोका संभवतो. यासाठीच तिसऱ्या लाटेसाठी पावले उचलणे अधिक गरजेचे आहे. तसेच राज्यांना मोदी यांनी सल्ला दिला की, मायक्रो कंन्टेटमेंट मध्ये आपल्याला वेगाने काम करावे लागणार आहे. जेथे अधिक रुग्ण आढळत आहेत तेथे लक्ष ठेवावे लागणार आहे.

देशातील सर्व राज्यांनी नव्या आयसीयू बेड तयार करणे, चाचण्यांची क्षमता वाढवणे आणि अन्य गरजांसाठी फंड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. केंद्र सरकारने नुकताच 23 हजार कोटीहून अधिक रुपये आपत्कालिन कोविड फंड जाहीर करण्यात आला आहे. याचा उपयोग आरोग्याच्या सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी करावा. खासकरुन ग्रामीण भागात अधिक काम करणे गरजेचे आहे. आयटी सेक्टर मध्ये कॉल सेंटर सारखी सुविधा सुद्धा मजबूत करणे गरेजेच आहे. यामुळे डेटा ट्रेकिंग करणे सोप्पे होणार आहे.