तुम्हाला देशाचा चौकीदार पैसे चोरणारा हवा आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधाकांना टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी (File Photo, Photo Credit -Twitter BJP)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तुम्हाला देशाचा चौकीदार पैसे चोरणारा हवा आहे का? तुमचे पैसे चोरुन स्वत:च्या घरी वाटणारा हवा आहे का? असे खडे बोल विरोधकांना सुनावले आहेत. विरोधकांना केंद्रामध्ये मजबूत असे सरकार नको आहे. उलट स्वत:चेच दुकान चालवण्यात रस आहे.भाजपाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत असे खडे बोल ऐकवून मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीला लक्ष्य केले आहे.

मोदींच्या राष्ट्रीय परिषदेला अनेक मंत्री, खासदार आणि आमदार यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मोदींनी आपण कठीण परिस्थितींवर मात करत इथवर पोहचलो आहोत. तसेच पक्षाला प्रबळ बनविले आहे. मात्र जर इतरांच्या बोलण्यावर भुललो असतो तर आपण नक्कीच फसलो असतो असे मोदी या परिषदेवेळी म्हणाले. तसेच पक्षाने आजवर जी मेहनत आणि शिस्तीने काम केले त्यामुळेच पक्ष आजवर इथवर पोहचला आहे. (हेही वाचा- भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, हल्लेखोर पसार)

परंतु तुम्हाला प्रधानसेवक कसा हवा असा प्रश्न विचाला. तर तुमचे पैसे चोरुन स्वत:च्या घरात देणारा प्रधानसेवक हवा का? असे प्रश्न मोदींनी परिषदेदरम्यान उपस्थित केले. विरोधकांच्या महाआघाडीवर हल्लाबोल करत जे पक्ष ऐकेकाळी काँग्रेसच्या विरोधात होते,ज्यांची विचारसरणी काँग्रेस (Congress) विरोधी होती ते आज एकत्र येत आहेत. (हेही वाचा- सवर्ण आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; मोदींनी ट्विटरवरुन व्यक्त केला आनंद)

तर पाच राज्यांच्या निवडणुकांच्या वेळी तेलंगणात त्यांचा पराभव झाला. त्यामुळे तिथले मुख्यमंत्री, मी क्लार्क झालो अशी बतावणी करतात. विरोधकांकडून दाखवण्यात येणारे हे चित्र एक ट्रेलर असल्याचे मोदींनी म्हटले आहे. येत्या काळात लवकरच संपूर्ण चित्रपट पाहायला मिळेल अशी टीका विरोधकांवर मोदींनी केली आहे.