भाजप नेत्याची गोळी झाडून हत्या, हल्लेखोर पसार
Bihar BJP leader Shot Dead | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Bihar BJP leader Shot Dead: भारतीय जनता पक्षाचे (BJP) बिहार येथील स्थानिक नेते बैजू प्रसाद गुप्ता (Baiju Prasad Gupta) यांची गोळ्या झाडून अज्ञातांनी हत्या केली आहे. ही घटना मुजफ्फरपूर जिल्ह्यातील (Muzaffarpur District ) सिवाईपट्टी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या पाखी चौख परिसरात घडली. प्राप्त माहितीनुसार, बैजू प्रसाद गुप्ता हे आपल्या मेडिकल शॉपमध्ये बसले होते. दरम्यन, एक अज्ञात व्यक्ती आला. त्याने औषधांबद्दल विचारले आणि ते बेसावद असल्याचे पाहून त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडल्या. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थली दाखल झाले. गुप्ता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना उपचारापुर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक काडतून आणि रिकामी पुंगळी जप्त केली आहे.

या प्रकरणात पूर्व मुजफ्फरपूरचे डीएसपी गौरव पांडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, 'आम्हाला मिळालेली माहिती अशी की, एका अज्ञात व्यक्तिने बैजू प्रसाद यांना गोळी मारली. या हत्येचे कारण शोधण्यासाठी आम्ही तपास करत आहोत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरु आहे. वेळ पडल्यास काही ठिकाणी आम्ही छापेमारीही करु. परंतू, आरोपीहाला अटक करु', असे पांडे म्हणाले. दरम्यान, गुप्ता यांच्याबाबत माहिती देताना पांडे म्हणाले, 'स्थानिकांनी सांगितले की, भाजप नेता गुप्ता यांचे छोटे मेडिकल स्टोअर होते. या ठिकाणी ते घरी बनवलेली औषधे परिसरातील लोकांना देत असत.' (हेही वाचा, भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये गोळी झाडून हत्या)

दरम्यान, यापूर्वी 20 डिसेंबर रोजी बिहारमधील प्रसिद्ध व्यापारी गोपाल खेमका यांचा मुलगा गुंजन खेमका यांची हत्या करण्यात आली होती. खेमका यांची हाजीपूर येथील औद्योगिक वसाहतीत एक कारखाना आहे. या कारखान्याबाहेरच हल्लेखोरांनी खेमका यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या केली. गुंजन हे आपल्या गाडीतून कारखान्याजवळ पोहोचले होते ते गाडीतून उतरत असतानाच त्यांच्यावर हल्ला झाला. या घटनेनंतर अवघ्या दोनच दिवसात हल्लेखोरांनी शाही कंस्ट्रक्शनचे मालक कुशेस प्रसाद शाही यांची हत्या केली. या सर्व हत्यांचा घटनाक्रम तपासता बिहार हे पुन्हा एकदा जंगलराज बनत आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.