भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांची धावत्या ट्रेनमध्ये गोळी झाडून हत्या
Jayantilal Bhanushali (Photo Credit: Twitter)

भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली (Jayantilal Bhanushali) यांची धावत्या ट्रेनमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली. ही घटना कटारिया-सुरबरी रेल्वे स्थानकादरम्यान सयाची नगरी एक्स्प्रेसमध्ये मंगळवारी रात्री घडली.

सयाची नगरी एक्स्प्रेसमधून प्रवास करत असणाऱ्या भाजपाचे माजी आमदार जयंतीलाल भानुशाली यांच्यावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणाची अधिक चौकशी सुरु आहे.

गेल्यावर्षी सुरतमधील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना फॅशन डिझाईनमध्ये प्रवेश देण्यासाठी अश्लील व्हिडीओ क्लिप बनवत असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना भाजपाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र हे सर्व आरोप निराधार असल्याचे भानुशाली यांचे म्हणणे होते.

भानुशाली कच्छच्या अबडसा विधानसभा मतदारसंघातून 2007 ते 2012 या काळात आमदार होते.