नरेंद्र मोदी (Photo Credits: PTI/File)

पाच राज्यातील विधानसभेच्या निकालानंतर पराभूत झालेलं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा निवडणूकीत अपयशी झाल्यानंतर मोदी सरकार शेतकऱ्यांचे तब्बल 4 लाख कोटींचे कर्ज माफ करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी ( PM Narendra Modi) आज खासदारांशी संवाद साधणार आहेत. या कर्जमाफीचा लाभ 2 लाख 63 हजार शेतकऱ्यांना मिळू शकतो. BJP ची लाट का ओसरली? जाणून घ्या

छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या तीन मोठ्या राज्यातील पराभवामुळे भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. त्यामुळे मतदारांची नाराजी दूर करण्याचा मोदी सरकारचा हा एक प्रयत्न असावा. त्याचबरोबर असा फटका लोकसभा निवडणूकीत बसू नये म्हणून पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतात. शिवसेनेची 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपावर टीका

आता पर्यंत कोणत्याच केंद्र सरकारने इतक्या मोठ्या रक्कमेची कर्जमाफी दिलेली नाही. त्यामुळे मोदी सरकारचा हा निर्णय ऐतिहासिक ठरेल. तसंच मतदारांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे.