पंतप्रधान नरेंद्र मोदी (Photo Credit: Twitter)

पाच राज्यांच्या विधानसेभेच्या निवडणूकींच्या निकालानंतर भाजप (BJP) ला 440 वोल्टचा झटका लागल्यासारखी त्यांची अवस्था झाली आहे. तर निकालानंतर विश्लेषकांनी भाजपाच्या ओसरलेल्या लाटेवर तर्कवितर्क काढण्यास सुरुवात केली.

मोदी सरकराने राज्यामध्ये नोटाबंदी (Demonetisation), जीएसटी (GST), वाढती बेरोजगारी, अॅट्रॉसिटी (Atrocity) च्या वाढत्या घटना आणि शेतकरी कर्जमाफी अशी विविध प्रमुख कारणे भाजपसाठी धोकादायक ठरले.

BJP ची लाट ओसण्यामागील काही कारणे:

-प्रशासनातील भ्रष्टाचार

-वाढती बेरोजगारी, जीएसटी आणि अॅट्रॉसिटीच्या वाढत्या घटना

-भाजीपाला आणि गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने महिलांमध्ये भाजपविरोधात संताप

-राजस्थान येथे रस्ते विस्तारणासाठी मंदिरावर बुलडोझर चढविल्याने भारतीयांमध्ये नाराजी

-राजधानी येथे शेतकऱ्यांवर केलेला लाठीमार

-नोटाबंदीमुळे राजस्थानमध्ये संताप

-शेतकरीविरोधी धोरणांमुळे मध्य प्रदेश, छत्तीसगढ येथील शेतकऱ्यांध्ये नाराजीचे सूर

-पिकांच्या मूलभुत किंमतीत झालेली घसरण

-विद्यमान आमदारांना तिकिटे न दिल्याने पक्षाअंतर्गत वाद

-नक्षलप्रभावित भागामध्ये भाजपाविरोध संताप

-नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला लागलेली झळ

भाजप सत्ता हरल्यामुळे मोदी सरकारची झोपच उडाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मोदींनी दिलेली आश्वासने पाळली नसल्याच्या ही टीका त्यांच्यावर करण्यात येत आहेत.