Prime Minister Narendra Modi (ANI Photo)

कोरोना (Coronavirus) संकट काळात नोकरी गमावलेल्या मजुरांसाठी केंद्र सरकारने आज गरीब कल्याण रोजगार योजना (PM Gareeb Kalyan Rojgar Yojna) जाहीर केली आहे. बिहार (Bihar) मधील खगरिया (Khagariya) येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी या योजनेचे उद्घाटन केले. या प्रसंगी मोदींनी स्थानिकांशी संवाद साधत असताना देशातील गावाखेड्यांचे विशेष कौतुक केले. कोरोना संकट हे देशासाठी कठीण काळ आहे, या महामारीने जगातील मोठाली शहरे उद्ध्वस्त केली आहेत. पण आपल्याकडील गावांनी या संकटाला दिलेले उत्तर हे खरोखरच सर्वांसाठी शिकवण आहे असे सुद्धा पंतप्रधानांनी म्हंटले आहे.(भारतामध्ये 24 तासांत सर्वाधिक 14516 नवे रूग्ण तर 375 जणांचा मृत्यू; COVID-19 बाधितांची संख्या 395048 वर)

मोदींनी आपल्या भाषणात म्हंटले की, "देशातील ग्रामीण भागातील लोकसंख्या ही युरोप, अमेरिका, रशियापेक्षा जास्त आहे. इतकी लोकसंख्या असताना कोरोनाला यशस्वीपणे लढा दिला जातोय. आपण जे केलं तितकं काम किंवा त्यापेक्षा अर्धे काम पाश्चिमात्य देशात झालं असतं, प्रचंड कौतुक झालं असतं. आपल्या देशातही काही लोक आहेत, जे तुमची पाठ थोपटणार नाहीत. पण, मी तुमचा जय जयकार करत राहणार आहे. गावांना आणि गावातील लोकांना सांभाळणाऱ्यांना मी नमन करतो".

ANI ट्विट

दरम्यान, केंद्र सरकाने गरीब कल्याण रोजगार योजनेसाठी 50 हजार कोटी रूपयांचा प्लॅन आखला आहे. यातून रस्ते बांधणीसह ग्रामविकासाला साहाय्यभूत ठरणाऱ्या कामातून रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. आजवर गरीब मजुरांनी, कामगारांनी आपल्या घामाने, मेहनतीने शहरांना झळाळी दिली पण आता त्यातून आपल्याला गावांना झळाळी द्यायची आहे, असे ही मोदींनी म्हंटले आहे.