Narendra Modi In Varanasi (Photo Credits: ANI)

लोकसभा निवडणूक 2019 मधील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज वाराणसीमध्ये दाखल झाले होते. तेथे त्यांनी काशी विश्वेवर मंदिरातील पूजेनंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.  संवाद साधताना त्यांनी सर्वप्रथम ऐतिहासिक विजयासाठी कार्यकर्त्यांचे आभार मानले. (वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर भव्य रॅली; काशी विश्वेवर मंदिरामध्ये पूजा)

देशाने मला पंतप्रधान म्हणून निवडले असले तरी तुमच्यासाठी मी एक कार्यकर्ताच आहे. काशीतील प्रत्येक कार्यकर्ता नरेंद्र मोदी म्हणून लढला. कार्य आणि कार्यकर्ता देशात चमत्कार घडवतात, असे यावेळी मोदी म्हणाले. तसंच मोदींनी मुलींच्या स्कूटी रॅलीचे मोदींनी यावेळी विशेष कौतुक केले.

ANI ट्विट:

कार्यकर्त्यांचं समाधान हाच आमचा जीवनमंत्र असल्याचे मोदी यावेळी म्हणाले. काशीतल्या लोकांनी प्रेम आणि ताकद दिल्याचे सांगत त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशचे आभार मानले आहेत. उत्तर प्रदेशातील 2014, 2017 आणि 2019 मधील विजयाच्या हॅट्रीकचा अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संस्कारासोबतच विज्ञानाला दिलेले महत्त्व हे भाजपचे वैशिष्ट्य असल्याचे मोदी म्हणाले. पारदर्शक, सकारात्मक कामांवर भर देणार असल्याचे सांगत नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांसह उत्तर प्रदेशचे मनापासून आभार मानले.