वाराणसी मध्ये नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणूक निकालानंतर भव्य रॅली; काशी विश्वेवर मंदिरामध्ये पूजा
Narendra Modi (Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणूक 2019 मधील भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या ऐतिहासिक विजयानंतर आज मोदी वाराणसीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या भव्य मिरवणूकीमध्ये भाजपा कार्यकर्त्यांसोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा (Amit Shah) देखील आहेत. आज त्यांनी वाराणसीमध्ये काशी विश्ववेश्वर मंदिराला भेट दिली आहे. तेथे विधीवत पूजेला सुरूवात झाली आहे.

नरेंद्र मोदींचे वाराणसीमध्ये आगमन

काही दिवसांपूवी निवडणूकींचा टप्पा पार पडल्यानंतर त्यांनी केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले होते. वाराणसी हा नरेंद्र मोदींचा मतदारसंघ आहे. येथून त्यांना सलग दुसर्‍यांदा लोकसभेवर मतदारांनी निवडून पाठवले आहे. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसी शहर सजले आहे. विमानतळावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले.

बाबा विश्वनाथ पूजा

येत्या 30 मे दिवशी नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. काल त्यांनी अहमदाबादला जाऊन त्यांच्या आईचे आर्शिवाद घेतले आहेत.