लिझ ट्रस (Lizz Truzz) यांच्या राजीनाम्यानंतर काल म्हणजेच दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर अखेर ब्रिटेनला (Britain) नवा पंतप्रधान मिळाला. भारतीय वंशाचे  ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी पेनी मॉर्डॉंट (Penny Mordaunt) यांचा पराभव करत ब्रिटनचे नवे पंतप्रधान होण्याचा मान मिळवला आहे. तरी 28 ऑक्टोबर रोजी ऋषी सुनक (Rishi Sunak) पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. दिवाळीच्या (Diwali) मुहूर्तावर पहिले भारतीय वंशाचे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्याने ब्रिटेनसह भारतातत देखील मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय राजकीय मंडळी, सिनेअभिनेते तसेच सर्व सामान्यांकडून ब्रिटेनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ट्वीट (PM Modi tweet) करत ऋषी सुनक यांना अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Indian Origin Rishi Sunak) ब्रिटेनचे पंतप्रधान झाल्याबाबात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनक यांना विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदी ट्वीट (PM Modi tweet) करत म्हणाले, पंतप्रधान सुनक यांच्या सोबत जागतिक समस्यांवर एकत्र काम करण्यासाठी आणि रोडमॅप 2030 ची अंमलबजावणी करण्यास भारत उत्सुक आहे. भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्याने भारत-ब्रिटेन ऐतिहासिक संबंधांचं आधुनिक भागीदारीत रूपांतरित होईल असं पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीट मधून व्यक्त झाले आहेत. (हे ही वाचा:- Rishi Sunak Becomes New UK PM: भारतीय वंशाचे ऋषी सुनक सात वर्षात कसे बनले ब्रिटनचे पंतप्रधान ? जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास)

कोण आहेत ऋषि सुनक?

ऋषी सुनक यांचे पालक आजी-आजोबांसोबत ब्रिटनला (Britain) गेले होते. त्यानंतर 1980 मध्ये हॅम्पशायरच्या साऊथ हॅम्पटनमध्ये ऋषी सुनक यांचा जन्म झाला.त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड (Oxford) विद्यापीठातून तत्त्वज्ञान ,राजकारण, आणि अर्थशास्त्रात उच्च शिक्षण घेतलं. नंतर स्टँडफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं (MBA) शिक्षण पूर्ण केलं.राजकारणात येण्यापूर्वी ऋषी सुनक यांनी गोल्डमॅन सॅकमध्ये काम केलं आहे. त्यानंतर त्यांनी स्वत:ची एक गुंतवणूक कंपनी स्थापन केली. ते सरकारमध्ये आधी ज्युनिअर मंत्री होते. त्यांना 2018 साली ब्रिटनचे निवास मंत्री करण्यात आलं. नंतर ते ब्रिटेनचे अर्थमंत्री झालेत. अर्थ मंत्रालय ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय आहेत.