PM Kisan Yojana चा आज नववा हप्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी पाठवणार लाभार्थ्यांच्या खात्यात 19,500 कोटी रुपये
PM Narendra Modi (Photo Credits: Twitter)

पंतप्रधान किसान सम्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत आज पुढील हप्ता दिला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी 12.30 मिनिटांनी व्हिडिओ कॉन्फ्रेंन्सिंगच्या माध्यमातून 9.75 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या परिवाला 19,500 कोटी रुपयांहून अधिक रक्कम त्यांच्या खात्यात पाठवणार आहेत. कार्यक्रमादरम्यान, नरेंद्र मोदी लाभार्थ्यांसोबत बातचीत करण्यासह राष्ट्राला सुद्धा संबोधित करणार आहेत. यावेळी केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर सुद्धा उपस्थितीत असणार आहेत.(Foreign portfolio investors: ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एफपीआयने इक्विटी विभागात गुंतवले 975 कोटी)

पीएम किसान योजना अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्याच्या परिवाराला 6 हजार रुपये प्रति वर्षाची आर्थिक मदत केली जाते. 2 हजार रुपयांचे 3 हप्ता हा प्रत्येक 4 महिन्यामध्ये दिला जातो. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँकेत पाठवली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटींहून अधिक रक्कम ही लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे.

Tweet:

या योजनेत सर्वाधिक लक्षात घेण्याची गोष्ट अशी की, तुमचा अर्ज चुकीचा नसायला पाहिजे. नाहीतर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. पीएम किसान योजनेनुसार 13 जुलै 2021 पर्यंत केंद्र सरकारकडे 12.30 कोटी लोकांचे अर्ज आले होते. परंतु त्यामधील 2.77 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज चुकले होते. या अर्जामध्ये सुधारणा करायला पाहिजे होत्या. जवळजवळ 27.80 लाख शेतकऱ्यांचे ट्रांजेक्शन फेल झाले होते. तसेच 31.63 लाख शेतकऱ्यांचे अर्ज हे पहिल्याच टप्प्यात रद्द झाले होते.