PM Narendra Modi (Photo Credits: PTI)

पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. जगातील लोकप्रिय नेत्यांच्या (Popular Leaders) यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आघाडीवर आहे. जागतिक नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी (PM Modi) 75 टक्के रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. महासत्ता देश अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांचा या सर्वेतील यादीत टॉप 10 मध्ये देखील समावेश नाही. तर भारताचे पंतप्रधान मोदींची लोकप्रियता मात्र जागतिक पातळीवर कमालीची आहे. प्रत्येक भारतीयांना अभिमान वाटण्यासारखी ही गोष्ट आहे. तर भारताचे प्रतिस्पर्धी पाकिस्तान (Pakistan) किंवा चीन (China) सारख्या मोठ्या देशातील नेत्यांचा या यादीत समावेश देखील नाही.

 

लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदीं पाठोपाठ मेक्सिकोचे (Mexico) राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (Andrés Manuel López Obrador) यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानंतर मजल मारत ऑस्ट्रेलियाचे (Australia) पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Anthony Albanese) यांनी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत तिसरा क्रमांक नोंदवला आहे.  या पाठोपाठ या यादीत स्वित्झर्लंड(Switzerland), इटली (Italy), स्वीडन (Sweden) या देशांचा समावेश होतो. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स (Morning Consult Political Intelligence) याकडून हा जागतिक दर्जाचा सर्वे करण्यात आला आहे. एके वेळी भारत या देशाच्या पंतप्रधानाचं नावं जागतिक स्तरावर माहिती असणं हे देखील दुर्मिळ होत पण आज त्याचं भारताच्या पंतप्रधानाने जागतिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिला क्रमांक पटकावणे ही भारतासाठी महत्वाची बाब आहे.(हे ही वाचा:-Ghulam Nabi Azad Resignation: काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांचा कॉंग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा)

 

मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स कडून केलेली ही  रेटिंग 17 ते 23 ऑगस्ट 2022 पर्यंत गोळा केलेल्या डेटाच्या आधारे काढण्यात आली आहे. ही रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढ रहिवाशांच्या सात दिवसांच्या सरासरीवर काढण्यात आली आहे. तरी अमेरीकेचे (America) राष्ट्रध्यक्ष जो बायडन (Joe Biden) या यादीत अकराव्या क्रमांकावर, फ्रान्सचे (France) राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) तेराव्या तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) विसाव्या क्रमांकावर आहेत.