पेट्रोलियम कंपन्यानी आज सलग 20 व्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलपेक्षा डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी अधिक आहेत. आजच्या दिवशी दिल्लीत पेट्रोल 80.13 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 80.19 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात अनुक्रमे 21 आणि 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीशिवाय देशाच्या इतर राज्यांतही पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत.
मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 0.19 रुपयांनी वाढल्याने 86.89 रुपये प्रति लीटरने पेट्रोल मिळत आहे. तर कोलकाता मध्ये 81.80 रुपये लीटरने पेट्रोल विकले जात आहे. कोलकाता येथे पेट्रोलचे दर 0.19 रुपयांनी वाढले आहेत. चेन्नईत पेट्रोल 83.35 रु. प्रति लीटरने विकले जात असून त्यात 0.17 रुपयांनी वाढ झाली आहे.
पहा महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल डिझेलच्या किंमती:
शहरं |
पेट्रोल दर |
डिझेल दर |
मुंबई | रु. 86.89 | रु. 78.49 |
दिल्ली | रु. 80.13 | रु. 80.19 |
चेन्नई | रु. 83.35 | रु. 77.42 |
कोलकाता | रु. 81.80 | रु. 75.32 |
बंगळुरु | रु. 82.72 | रु. 76.24 |
हैद्राबाद | रु. 83.16 | रु. 78.34 |
पुणे | रु. 86.60 | रु. 77.03 |
जयपूर | रु. 87.23 | रु. 80.97 |
भोपाळ | रु. 87.75 | रु. 79.06 |
दिल्लीमध्ये डिझेलचे दर पेट्रोल पेक्षा अधिक असले तरी इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलपेक्षा महाग आहे. मुंबईत डिझेलचे दर 78.49 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर अनुक्रमे 75.32 रुपये आणि 77.42 रुपये प्रति लीटरने मिळत आहे.
बंगळुरु, हैद्राबाद, पुणे, जयपूर आणि भोपाळ येथे पेट्रोलचे दर अनुक्रमे 82.72 रु., 83.16 रु., 86.60 रु.. 87.23 आणि 87.75 रुपये प्रति लीटर असे आहेत. तर याच शहरांमध्ये डिझेलचे दर 76.24 रु., 78.34 रु., 77.03 रु.. 80.97 रु. आणि 79.06 रु. प्रति लीटर इतके आहेत.