
केवळ एक दिवसाच्या दिलाशानंतर देशातील पेट्रोल-डिझेल दर (Petrol-Diesel Rate In India) पुन्हा वाढले आहेत. राजधानी दिल्लीसह (Delhi) मुंबई (Mumbai), चेन्नई, कोलकाता (Kolkata या शहरांमध्ये प्रामुख्याने ही वाढ होताना दिसत आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 81 रुपये दराने विकले जात आहे. तर, मुंबई शहरात हेच पेट्रोल (Petrol Rate) प्रति लीटर 87.68 रुपये दराने विकले जात आहे. चेन्नईत 84 रुपये प्रति लीटर पेक्षाही अधिक दराने पेट्रोल विकले जात आहे. दरम्यान, या प्रमुख शहरांमध्ये डिझेल (Diesel Rate) दरांमध्येही मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळते आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किमती सातत्याने घसरत असतानाही देशात पक्क्या तेलाच्या किमती वाढताना दिसत आहेत. बेंचमार्क कच्चे तेल ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 45 डॉलर इतका खाली आला आहे. असे असताना तेल वितरण कंपन्यांनी कोलकाता, मुंबई आणि चेन्नई या चारही मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल दरात प्रति लीटर 10 पैसे दरांनी वाढ केली आहे. (हेही वाचा, Renault Duster टर्बो पेट्रोल मॉडेल भारतात लॉन्च, किंमत 10.49 लाखांपासून सुरु)
देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल, डिझेल दर (20 ऑगस्ट 2020) |
|||
शहराचे नाव | पेट्रोल दर (प्रति लीटर) | डिझेल दर (प्रति लीटर) | |
1 | दिल्ली | 81 रुपये | 73.56 रुपये |
2 | कोलकाता | 82.53 रुपये | 77.06 रुपये |
3 | मुंबई | 87.68 रुपये | 80.11 रुपये |
4 | चेन्नई | 84.09 रुपये | 78.86 रुपये |
आकडेवारी इंडियन ऑयल वेबसाईटनुसार |
आंतरराष्ट्रीय वायदे बाजारात आयसीईवर ब्रेंट क्रूडसोबत ऑक्टोबर डिलीव्हरी मध्ये गेल्या सत्राच्या 0.84% घसरणीसोबत 44.99 डॉलर प्रति बॅरल इतक्या दरावर उलाढाल सुरु होती. तर अमेरिकेत लाईट क्रूड वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट म्हणजेच डब्ल्यूटीआय सोबत सप्टेंबर डिलीव्हरी अनुबंधात गेल्या सत्रात 1.02% घसरणीसह 42.67 डॉलर प्रति बॅरलवर उलाढाल सुरु होती.