नवी दिल्ली: पेट्रोल (Petrol) डिझेल (Diesel) चे वाढते दर हा नेहमीच चिंतेचा विषय मानला जातो, मात्र मागील सहा दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने घट होत असल्याने सामान्य नागरिक सुखावलेला दिसून येतेय. देशातील प्रमुख तेल विक्रेत्या कंपन्यांनी मंगळवारी पेट्रोलच्या दरांमध्ये सात पैश्याची तर डिझेलच्या भावात 20 त 22 पैश्यांची कपात केली आहे. प्राप्त माहितीनुसार आंतरराष्ट्रीय तेलाच्या व्यापारात देखील किंमतीत घट होत असल्यामुळे येत्या काही दिवसात हे भाव आणखीन कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इंडियन ऑइल कंपनीच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मुंबई मध्ये सध्या पेट्रोलचे दर कमी करून 76.91 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहेत तर सोबतच दिल्ली मध्ये 71.23 रुपये, कोलकाता मध्ये 73.47 रुपये, व चेन्नई मध्ये 74.01 रुपये प्रति लिटर किंमत आकारण्यात येणार आहेत.याशिवाय मुंबईमध्ये डिझेलचा भाव हा 68.76 रुपये इतका कमी करण्यात आला असून दिल्ली मध्ये 65.56 रुपये, कोलकाता मध्ये 67.48 रुपये, व चेन्नई मध्ये 69.36 रुपये प्रति लीटर इतकी घट करण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर पेट्रोल-डिझेलची तस्करी ; बिहारच्या 'या' शहरात पेट्रोलची किंमत फक्त 69 रुपये
तेल निर्मात्या व विक्रेत्या कंपन्यांनी मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सलग सातव्या दिवशी घसरण होत असल्याने कच्चे तेल, ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत प्रति बॅरेल 10 डॉलरची कपात केली आहे.