Representational Image | File Image | (Photo Credits: Getty Images)

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) आज (शनिवार, 26 जून) पुन्हा एकदा वाढ झाली आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आजही वाढवल्या आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोल 35 पैसे प्रती लीटर आणि डिझेल 35 पैसे प्रति लीटर ने महागले आहे. या वाढीनंतर दिल्लीत (Delhi) आज पेट्रोलचे दर 98.11 रुपये प्रति लीटर आणि डिझेलचे दर 88.65 रुपये प्रति लीटर इतके झाले आहेत. आजच्या वाढीनंतर देशातील इतर शहरांमध्येही पेट्रोलने शंभरी गाठली आहे. (Petrol And Diesel Price: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची होर्डिंगबाजी, पेट्रोल दरवाढीवरून मोदी सरकारवर सडकून टीका)

मुंबईत आज पेट्रोल 104.22 रुपये प्रति लीटर झाले आहे. ही उच्चांकी वाढ असून डिझेल 96.16 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. मुंबईत यापूर्वीच पेट्रोलने शंभरी गाठली होती. मात्र आजच्या वाढीने पटनामध्येही पेट्रोलच्या किंमतीने 100 चा आकडा पार केला आहे. पटनामध्ये पेट्रोल 100.13 रुपये आणि डिझेल 94.00 रुपये प्रति लीटरने मिळत आहे. भोपालमध्ये पेट्रोलची किंमत 106.35 रुपये प्रति लीटर असून डिझेल 97.37 रुपये प्रति लीटर आहे.

ANI Tweet:

केरळच्या तिरुवनंतपुरम मध्येही पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या पार गेली आहे.  तेथे पेट्रोल 100.09 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. कोलकाता मध्ये पेट्रोल 97.97 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 91.50 रुपये प्रति लीटरने उपलब्ध आहे. चैन्नईमध्ये पेट्रोलची किंमत 99.19 रुपये प्रति लीटर आणि डिझेलची किंमत 93.23 रुपये प्रति लीटर इतकी आहे.

आजच्या वाढीनंतर देशातील 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. यात राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, जम्मू आणि कश्मीर, ओडिशा, लद्दाख, बिहार आणि केरळ यांचा समावेश आहे.