देशात गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात मोठी वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, मुंबई-ठाण्यात (Mumbai- Thane) पेट्रोलच्या दराने (Petrol Prices) शंभरी गाठली आहे. ठाण्यात आज पेट्रोलचा भाव 100.4 रुपये आणि 91.87 रुपये प्रति लिटर आहे. दरम्यान, पेट्रोलचे दर शंभर रुपयांवर गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ठाण्यात हर्डिंगबाजी करत भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अच्छे दिनाच्या शेभुच्छा देत मोदी सरकारला चिमटा काढला आहे.
नुकतीच पार पडलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर देशात सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली आहे. या महिन्यातील 4 तारखेनंतर आज चौदावी दरवाढ झाली आहे. इंधनाच्या दरवाढीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे. पेट्रोल दरवाढची निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात जोरदार होर्डिंगबाजी केली आहे. या होर्डिंग्जवर दाढीवाल्या फलंदाजाचे चित्र आहे. तसेच “मॅन ऑफ दी मॅच; पेट्रोल 100 नॉट आऊट; अच्छे दिनाच्या शुभेच्छा” असा खोचक मजकूर या होर्डिंग्जवरवर लिहिण्यात आला आहे. हे देखील वाचा- Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे छत्रपती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर-
शहर | पेट्रोल | डिझेल |
दिल्ली | 93.68 रुपये | 84.61 रुपये |
मुंबई | 99.94 रुपये | 91.87 रुपये |
कोलकाता | 93.72 रुपये | 87.46 रुपये |
चेन्नई | 95.28 रुपये | 89.39 रुपये |
राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये इंधन दरांनी प्रतिलीटर 100 रुपयांचा आकडा पार केला आहे. नुकत्याच झालेल्या वाढीसह मुंबईतील किंमतीही अधिक वाढीच्या दिशेने जाताान दिसत आहेत. दरम्यान, वृत्तसंस्था रॉयटरने दिलेल्या वृत्तानुसार अमेरिकेतील आर्थिक सर्व्हेक्शनाच्या आकडेवारीनुसार तिसऱ्या तिमाहिती जागतिक पातळीवरुन इधन मागणी वाढली आहे. यात भारताचाही समावेश आहे. त्यामुळे भारतातील देशांतर्गत तेल दरांच्या किमतीही वाढल्या आहेत.