
सन 2021 या वर्षातील शेवटच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच बुधवार, 1 डिसेंबर रोजी देशातील पेट्रोल-डिझेल दरात (Petrol, Diesel Price) कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. पेट्रोल Petrol), डिझेलचे दर (Diesel Price) स्थिर आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल दरावली उत्पादन शुल्क कपात केल्यानंतर सलग 27 व्या दिवशी हे दर स्थिर आहेत. दुसऱ्या बाजुला क्रुड दरात मात्र काही प्रमाणात घट पाहायला मिळते आहे. सोमवारी कच्चा तेल दरात 4% पेक्षाही अधिक तेजी पाहायला मिळाली. मात्र, मंगळवारी क्रुड ऑईल बाजार सुरु झाला तेव्हा त्यात घसरण पाहायला मिळाली. जागतिक परिमान मानल्या जाणाऱ्या ब्रेंट क्रुड दरात 2.70% घट होऊन तो प्रति बॅरल 71.46 डॉलर इतका झाला. भारतीतील विविध प्रमुख शहरांती इंधन दर घ्या जाणून.
पाठिमागील काही दिवसांपासून सातत्याने तेल दरात घसरण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुढील दोन आठवड्यातही पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी कपात होऊ शकते. कारण स्थानिक बाजारात पेट्रोल डिझेल दरात बदल 15 दिवसांच्या सरासरी चढउतार पाहून केले जातात. त्यामुळे या पंधरा दिवसात चढउतार कसे राहतात यावर बरेच काही अवलंबून असेल. (हेही वाचा, Impact of Excise Duty Reduction: पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्क कपातीचा काय होणार परिणाम? केंद्रावर किती पडणार बोजा, जनतेचा किती फायदा?)
भारतातील प्रमुख शहरांतील इंधन दर
दिल्ली-
पेट्रोल – ₹103.97 प्रति लीटर
डिझेल- ₹86.67 प्रति लीटर
मुंबई-
पेट्रोल – ₹109.98 प्रति लीटर
डिझेल– ₹94.14 प्रति लीटर
कोलकाता-
पेट्रोल – ₹104.67 प्रति लीटर
डिझेल– ₹89.79 प्रति लीटर
चेन्नई-
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लीटर
डिझेल– ₹91.43 प्रति लीटर
नोएडा-
पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर
डिझेल– ₹87.01 प्रति लीटर
भोपाल-
पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर
डिझेल– ₹90.87 प्रति लीटर
बेंगलुरु-
पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर
डिझेल– ₹85.01 प्रति लीटर
लखनऊ
पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर
डिझेल- 86.80 रुपये प्रति लीटर
चंडीगढ-
पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर
डिझेल– 80.90 रुपये प्रति लीटर
देशातील पेट्रोल, डिझेल दर प्रतिदिन बदलत राहतात. आपण केवळ एका SMS च्या माध्यमातूनही पेट्रोल, डिझेलचे आपल्या शहरातील दर जाणून घेऊ सकता. यासाठी आपण इंडियन ऑलय मेसेज सेवेच्या माध्यमातून 9224992249 या मोबाईल क्रमांकावर SMS पाठवू शकता. त्यासाठी मेसेज बॉक्समध्ये लिहा '- RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड'. आपल्या परिसरातील RSP आपण इंडियन ऑयलच्या वेबसाईटवर जाऊन तापसू शकता. मेसेज पाठवताच आपल्या मोबाईल क्रमांकावर पेट्रोल, डिझेलचे ताजे भाव पाहायला मिळतील.