Petrol Price In India | Representational Image | (Photo Credits: PTI)

Petrol, Diesel Fuel in India: महाराष्ट्रासह देशभरातील पेट्रोल (Petrol), डिझेल (Diesel) दर वाढ सलग चौथ्या दिवशीही सुरुच आहे. प्रामुख्याने राजधानि दिल्ली आणि मुंबई शहरातील पेट्रोल, डिझेल दरवाढ काहीशा अधिक प्रमाणात आहे. दिल्ली येथे पेट्रोल प्रति लिटर 73.40 रुपये तर, डीझेल प्रति लिटर 71.62 रुपये दराने विकले जात आहे. महाराष्ट्रात मुंबई (Mumbai) शहरातही पेट्रोल डिझेल दर वाढले आहेत. इथे पेट्रोल प्रति लिटर 80.40 तर डिझेल प्रति लिटर 70.35 रुपये दराने विकले जात आहे. वाढते इधन दर पाहता लॉकडाऊनमुळे हैराण झालेल्या लोकांना पुन्हा एकदा महागाईला तोंड द्यावे लागू शकते.

देशातील प्रमुख शहरांमधी पेट्रोल, डिझेल दर

देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल, डिझेल दर (प्रति लिटर)
शहराचे नाव पेट्रोल दर डिझेल दर
दिल्ली 73.40 रुपये 71.62 रुपये
कोलकाता 75.36 रुपये 67.63 रुपये
मुंबई 80.40 रुपये 70.35 रुपये
चेन्नई 77.43 रुपये 70.13 रुपये
         * आकडेवारी इंडियन ऑयल वेबसाइट नुसार

(हेही वाचा, Coronavirus Effect On Indian Economy: विद्यमान वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 3.2% घसरु शकतो- जागतिक बँक)

दरम्यान, कोरोना व्हायरस संकटामुळे अवघा देश लॉकडाऊन झाला. त्यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेकांचे पगार कापण्यात आले. अनेकांच्या समोर तर जगायचे कसे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशात आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढ वारंवार होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन, कोरोना व्हायरस संकटातून सावरत असताना नागरिकांना आता महागाईलाही तोंड द्यावे लागणार असल्याचे चिन्ह आहे.