
पेट्रोल डिझेल दरवाढ (Petrol-Diesel Price) आता नित्याचीच झाली आहे. त्यामुळे प्रतिदिन पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) किती रुपयांनी वाढले इतकेच पाहणे सर्वसामान्य जनतेच्या हातात राहते. काही प्रमाणात कधी पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले तर तो मोठा दिलासा समजला जातो. दरम्यान, आजही (19 ऑगस्ट, 2021) पेट्रोल डिझेल दरात काही चढउतार पाहायला मिळत आहेत. ऑईल मार्केटींग कंपन्यांनी डिझेल दरात सलग दुसऱ्या दिवशी कपात केली आहे. तर पेट्रोल दर मात्र जैसे थे आहेत. डिझेल दरात कालही (बुधवार, 18 ऑगस्ट) प्रतिलीटर 20 पैशांची कपात झाली होती. तर पेट्रोल द स्थिर होते. पाठीमागील सुमारे 33 दिवसांपासून पेट्रोल स्थिर राहिले आहेत. त्याच्या आदी 17 जुलै रोजी पेट्रोल प्रतिलीटर 35 पैशांनी महागले होते. तर डीझेल 15 जुलै रोजी 15 पैशांनी महागले होते. या इंधन दरवाढीनंदर (Fuel Rates) पेट्रोल डिझेल दर प्रदीर्घ काळ स्थिर राहिले होते.
दरम्यान, या आठवड्यात पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केल्याबाबत विचारल्या गेलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्तर दिले. त्यांनी म्हटले की पाठीमागील सरकार पेट्रोल डिझेल दरात कपात करण्याचा विचार करत नाही. कारण हे सरकार या आधीच्या सरकारच्या ऑयल बॉन्ड्स च्या ओझ्याखाली दबलेले आहे. (हेही वाचा, Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीला काँग्रेसच जबाबदार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे वक्तव्य)
देशभरातील प्रमुख शहरांतील पेट्रोल डिझेल दर
दिल्ली:
पेट्रोल – ₹101.84 प्रति लीटर
डिझेल- ₹89.47 प्रति लीटर
मुंबई
पेट्रोल – ₹107.83 प्रति लीटर
डिझेल– ₹97.04 प्रति लीटर
कोलकाता:
पेट्रोल – ₹102.08 प्रति लीटर
डिझेल– ₹92.57 प्रति लीटर
चेन्नई:
पेट्रोल – 99.47 रुपये प्रति लीटर
डिझेल– ₹94.02 प्रति लीटर
बेंगलुरु:
पेट्रोल – ₹105.25 प्रति लीटर
डिझेल– ₹94.86 प्रति लीटर
भोपाल:
पेट्रोल – ₹110.20 प्रति लीटर
डिझेल– ₹98.26 प्रति लीटर
लखनऊ:
पेट्रोल- 98.92 रुपये प्रति लीटर
डिझेल- 89.81 रुपये प्रति लीटर
पटना:
पेट्रोल – ₹104.25 प्रति लीटर
डिझेल– ₹95.16 प्रति लीटर
चंडीगढ:
पेट्रोल – ₹97.93 प्रति लीटर
डिझेल– ₹89.12 प्रति लीटर
देशातील प्रत्येक पेट्रल पंपावर दररोज सकाळी 6 वाजता नवे दर लागू होतात. कारण प्रत्येक ठिकाणचे स्थानिक महसूली कर वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक राज्यात अनेकदा पेट्रोल डिझेल तर वेगवेगळे असू शकतात. आपण पेट्रोल-डिझेलचे आपल्या प्रदेशातील दर SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्यासाठी आपल्याला इंडियन ऑयल SMS सेवेच्या माध्यमातून मोबाइल नंबर 9224992249 वर SMS पाठवू शकता. त्यासाठी आपला मेसेज असा लिहायला हवा. RSP<स्पेस>पेट्रोल पंप डीलर कोड. आपल्या परिसरातील RSP साईटवर जाऊन तपासू शकता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही सेकंदात आपल्या फोनवर ताजे पेट्रोल, डिझेल दर उपलब्ध होऊ शकतात.