Petrol, Diesel Prices Today | (Photo credit - File Manager)

इस्रायल आणि इराण (Israel and Iran) यांच्यातील ताणलेले संबंध, रशिया युक्रेन युद्ध (Russia Ukraine War) या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात अनेक घडामोडी घडत आहे. सहाजिकच त्याचा स्थानिक पातळीवरही तेल दरावर परिणाम जाणवत आहेत. भारतातील पेट्रोल, डिझेल दर (Petrol Diesel Price Today) नुकतेच जाहीर झाले. ज्याचा परिणाम देशाती विविध राज्यांवर साधक बाधक झाला. काही ठिकाणी ते स्थिर राहिले.. तर काही ठिकाणी वाढले. जाणून घ्या विविध राज्यांतील इंधन दरांमध्ये झालेले बदल.

वस्तविक पाहता भारतातील पेट्रोल-डिझेल दरांवर आंतरराष्ट्रीय तेल बाजाराच विशेष परिणाम झाला नाही. बहुतांश शहरांमध्ये तेलांचे दर स्थिरच राहिले आहेत. काही ठिकाणी मात्र त्यात किरकोळ वाढ पाहायला मिळते.

देशातील चार प्रमुख शहरातील पेट्रोल आणि डिझेल दर खालील प्रमाणे:

दिल्ली: पेट्रोल 94.72 रुपये तर, 87.62 रुपये (प्रति लीटर)

मुंबई: पेट्रोल 103.44 रुपये, डिझेल 89.97 रुपये (प्रति लीटर)

चेन्नई: पेट्रोल 100.85 रुपये, तर डिझेल 92.44 रुपये (प्रति लीटर)

कोलकाता: पेट्रोल 104.95 रुपये, तर डिझेल 91.76 रुपये (प्रति लीटर)

दरम्यान, काही शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्याही आहेत. त्यामुळे काही प्रमुख शहरांतील बदल खालील प्रमाणे:

लखनऊ: पेट्रोल 94.65 रुपये, तर डिझेल 87.76 रुपये (प्रति लीटर)

जयपुर: पेट्रोल 104.88 रुपये, तर डिझेल 90.36 रुपये (प्रति लीटर)

गौतमबुद्ध नगर: पेट्रोल 4.65 रुपये, तर डिझेल 87.75 रुपये (प्रति लीटर)

गाजियाबाद: पेट्रोल 94.65 रुपये, तर डिझेल 87.75 रुपये (प्रति लीटर)

भारतामध्ये पेट्रोल-डिझेल दर दररोज सकाळी 6 वाजता अद्ययावत होतात. ज्यामध्ये एक्साइज ड्यूटी, डीलर कमीशन आणि वॅट यांसारख्या विविध करांचा समावेश होतो. ज्यामुळे इंधन दरांच्या मूळ किमतींमध्ये मोठा बदल होतो आणि त्या बऱ्याच अधिक प्रमाणात वाढतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात बदललेल्या परिस्थितीतही भारतातील इंधन दर काही प्रमाणात स्थिर आहेत हे विशेष. अर्थात काही राज्यांमध्ये इंधन दरात बदल जरुर झाला आहे. पण, ते बदल अगदीच मोठ्या प्रमाणात आहेत असे नव्हे.

पेट्रोल डिझेल दराचा महागाईवर तत्काळ परिणाम होतो. कच्चा मलाची वाहतूक महागली की, सहाजिकच त्याचा परिणाम पक्क्या मालांवरही होतो. विविध सेवा आणि उत्पादने महाग होऊ लागतात. गरीब आणि श्रीमंत असलेल्या प्रत्येकासाठी आवश्यक असलेल्या भाज्यांवरही त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळतो.