Petrol, Diesel Price Today on January 1, 2023: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेल दरात काय बदल? तुमच्या शहरात काय भाव
Fuel | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

नववर्षाच्या पहिल्या दिवासापासून (Petrol, Diesel Price Today) म्हणजेच आज 1 जानेवारी 2023 पासून अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. त्यापैकी एक म्हणजे इंधन दर. पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी देशभरातील इंधन दर (Fuel Price Today) जाहीर करतात. साजिकच अनेकांना उत्सुकता असते की, नववर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेल, सीएनजी-पीएनजी दर काय आहेत. त्यात काही बदल झाला आहे का? तो झालाच असेल तर किती रुपयांनी इंधन वाढले, कमी झाले. जाणून घ्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या किंवा तुमच्या नजिकच्या शहरातील इंधन दर.

देशभरातील नागरिकांसाठी आनंदवार्ता आहे. पेट्रोल डिझेल दरांमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत. हे दर पूर्णपणे स्थिर आहेत. महत्त्वाचे म्हणजे आज सलग 225 व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. या आधी सरकारने 14 जुलै रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपये प्रतिलिटरने कमी केले होते. त्यानंतर महाराष्ट्रात इंधनाच्या दरात कपात करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचे दर आता 106.31 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. हे दर दरात 5 रुपयांची कपात केल्यानंतरचे आहेत. जे पूर्वी प्रति लिटर 111.35 रुपये होती. त्याचप्रमाणे, मुंबईत डिझेलची किंमत प्रतिलिटर 97.28 रुपयांवरून 94.27 रुपये प्रति लिटरवर आणली गेली आहे. म्हणजेच डिझेल दरातही 3 रुपयांनी कपात करण्या आली आहे. हे सर्व निर्णय आगोदरच घेण्यात आले आहेत. त्यामुळे या दरांमध्ये नव्या वर्षात कोणतेच बदल झाले नसून ते स्थिर आहेत. (हेही वाचा, New Rules in 2023: क्रेडीट कार्ड, बँक लॉकर, आधार-पॅन लिंक यांसह अनेक नियमांमध्ये 1 जानेवारी 2023 पासून महत्त्वाचे बदल, घ्या जाणून)

देशातील प्रमुख शहरांमध्ये आज डिझेल आणि पेट्रोलचे दर:

S. No. City Petrol price per litre (In Rs.) Diesel price per litre (In Rs.)
1. Delhi 96.72 89.62
2. Mumbai 106.31 94.27
3. Kolkata 106.03 92.73
4. Chennai 102.63 94.24
5. Bengaluru 101.94 87.89
6. Lucknow 96.57 89.76
7. Visakhapatnam 110.48 98.27
8. Ahmedabad 96.63 92.38
9. Hyderabad 109.66 97.82
10. Patna 107.24 94.04

केंद्राने 21 मे (2022) रोजी पेट्रोलवर प्रतिलिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रतिलिटर अबकारी कर कमी केल्यानंतर 22 मे रोजी संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची घट झाली होती. उत्पादन शुल्कात ही कपात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ९.५ आणि ७ रुपयांनी कपात करण्यात आली आहे.