पटना: झोमॅटोवरुन 100 रुपयांचे फूड मागवणे पडले महागात, बँक खात्यातून चोरी झाले 77 हजार
Zomato Logo (Photo Credits: Facebook)

सध्या ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारे विविध अॅप सोशल मीडियात युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामधील एक झोमॅटो असून त्यावरुन पटना (Patana) येथील एका तरुणाने 100 रुपयांचे खाद्यपदार्थ मागवले. परंतु फूडचा दर्जा उत्तम नसल्याने त्याने रिफंडसाठी तक्रारी केली असता त्याच्या खात्यामधून 77 हजार रुपये चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे.

विष्णु असे तरुणाचे नाव असून पेशाने इंजिनअर आहे. विष्णु याने ऑनलाईन फूड डिलिव्हरी अॅपच्या मदतीने खाद्यपदार्थ मागवले. त्यानुसार डिलिव्हरी बॉय खाद्यपदार्थ घेऊन गेला असता विष्णु याला खाद्यपदार्थांचा दर्जा आवडला नसल्याने ते पदार्थ त्याला परत केले. यावर डिलिव्हरी बॉयने त्याला झोमॅटोच्या कस्टमअर केअरला फोन करुन याबाबत सांगावे असा सल्ला दिला. त्यानंतर विष्णु याने गुगलवरुन झोमॅटो कस्टमर केअरचा क्रमांक सर्च केल्यानंतर पुढील गोष्टी फॉलो करण्यास सांगितल्या.

त्यानुसार विष्णु याने गुगलवरुन सर्च केलेल्या कस्टमर केअरला फोन लावला. फोन लावलेल्या क्रमांकावरील व्यक्ती झोमॅटो कस्टमअर केअरचा एक्झिक्युटिव्ह असल्याचे सांगत विष्णुला त्याच्या बँक खात्यामधून 10 रुपये कापून घेतले जातील असे सांगितले. त्यानंतरच तुम्हाला 100 रुपये रिफंड दिले जाणार असल्याचे ही फोनवरील व्यक्तीने विष्णुला सांगितले.(बंगळुरु: एका चुकीच्या Google Search मुळे महिलेने गमावली बँक खात्यामधील सर्व रक्कम)

त्यानुसार फोनवरील व्यक्तीने विष्णुला एका मेसेजच्या माध्यमातून लिंक पाठवली असता त्यामध्ये 10 रुपये भरण्यास सांगितले. मात्र एक सेकंदाचा सुद्धा विचार न करता विष्णु याने त्या लिंकवर क्लिक करत 10 रुपये भरले. मात्र पुढील एका मिनिटात विष्णु याच्या बँक खात्यामधून 77 हजार रुपये चोरी झाल्याचा प्रकार घडला. विष्णु याच्या सोबत 10 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला. तेव्हापासून विष्णु पोलिसांकडे धाव घेत असून अद्याप त्याबात काही तोडगा निघालेला नाही.