प्रियकर निघाला अल्पवयीन म्हणून प्रेयसीने पित्यासोबतच बांधली लग्नगाठ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Wikimedia Commons)

घरातून पळून जाऊन लग्न केलेल्या एका तरुणीने प्रियकरासोबत करायचे ठरविले होते. तसेच आयुष्यभर पदोपदी साथ देईन अशी शपथ घेऊन आपल्या संसाराला सुरुवात करण्यासाठी त्याच्यासोबत राहण्यासाठी युक्तीवाद केला. मात्र तरुणीला जेव्हा आपला नवरा अल्पवयीन असल्याचे कळले त्यावेळी चक्क तरुणीने अल्पवयीन मुलाच्या विधुर वडिलांसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे आता तरुणीला आपल्या प्रियकरासोबत त्याच्या घरी आई-मुलाच्या नात्याने राहण्याची वेळ आली आहे.

तरुणीने सरकारी कायद्यांपासून दूर राहण्यासाठी शक्कल लढवून प्रियकराच्या वडिलांसोबत लग्न केले. तसेच प्रियकराच्या समोर त्याच्या वडिलांसोबत सात फेरे घेत लग्नसोहळा पार पाडला. त्यामुळे आता दोघांनाही आई-मुलाच्या नात्यात राहणे भाग पडले आहे.(हेही वाचा-चेन्नई: प्रेम प्रकरण पडले भारी, तरुणाचा आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल (Video)

तर घरातून लग्न प्रेमविवाह करण्यासाठी पसार झालेल्या तरुणीच्या मंडळींना ती घरातून हरविली असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली. परंतु जेव्ही तरुणीला आपला प्रियकर अल्पवयीन असल्याचे समजल्याने तिने त्याच्या पित्यासोबत संसार थाटला आहे.