साजिन (फोटो सौजन्य-फेसबुक)

चेन्नई (Chennai) येथील एका 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला. त्यावेळी या व्हिडिओतून तरुणाने आपले दु:ख व्यक्त करत विष प्राशन करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र मित्रांनी जेव्हा तरुणाच्या फेसबुक पोस्टवरील हा व्हिडिओ पाहताच क्षणी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तर या तरुणावर सध्या रुग्णालयात उपाचार सुरु असल्याचे सांगितले आहे.

साजिन (Sajin) असे या तरुणाचे नाव आहे. साजिन ह्याचे नागरकोली येथील एका इंजिनिअरचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीसोबत प्रेम संबंध होते. तसेच या दोघांनी नुकताच काही दिवसांपूर्वी घरातल्यांच्या नकळत विवाह केला होता आणि आपापल्या घरी राहत होते. तसेच लग्न केल्यानंतरही दोघे एकमेकांशी रोज बोलत होते. मात्र साजिनने एकदा बायकोला एक प्रिय बायको असा मेसेज पाठवला. तर साजिनने हा पाठवलेला मेसेज तरुणीच्या घरातील पाहिला आणि तिला घरातील एका खोलीत कोंडून ठेवले. यामुळे साजिनने मदुराई न्यायालयात धाव घेत याबद्दल याचिका दाखल केली.

दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी साजिन आणि बायकोच्या घरातील मंडळी कोर्टात उपस्थित राहीली. त्यावेळी घरातील मंडळींनी साजिन विरुद्ध साक्ष देत त्याने आमच्या मुलीला फसवले असून तिला लाडीगोडी लावून तिच्याशी विवाह केला असल्याचे सांगितले. तर तरुणीने घरातील मंडळींसोबत यापुढे राहणार असल्याचे कोर्टात कबुल केले.

मात्र साजिनच्या घरातील मंडळींनी तरुणीशी बोलण्याचा प्रयत्न करुनही तिने त्यांच्याशी बोलणे टाळले. तर कोर्टातील सुनावणी नंतर तरुणीच्या घरतील मंडळींनी साजिन विरुद्ध खटला दाखल केला. त्यामुळे साजिनने या परिस्थितीला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेत त्याने फेसबुकवर आपण आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ पोस्ट केला.