Passenger Robbed by Cab Driver: प्रवाशाला नशेचे पाणी देऊन लुटले; आयफोन, पाकीट, सोने आणि रोख रक्कम घेऊन कॅब ड्रायव्हर पसार
Passenger Robbed by Cab Driver (Photo Credit : Pixabay)

Passenger Robbed by Cab Driver: दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीत सहभागी असलेल्या एका कॅब ड्रायव्हरला (Cab Driver) अटक केली आहे. ही व्यक्ती खोडा गाझियाबादचा रहिवासी आहे. तो पाण्यात किंवा कोल्ड्रिंकमध्ये अमली पदार्थ मिसळून प्रवाशांना देत असे. त्यानंतर प्रवासी बेशुद्ध होताच तो त्यांना लुटायचा आणि गाडीतून बाहेर फेकायचा. हे काम तो बऱ्याच दिवसांपासून करत होता. नुकतेच त्याने नोएडातील एका तरुणालाही अशाच प्रकारे लुटले होते. या पिडीत व्यक्तीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी सागरला पकडले. आता या संदर्भात गाझियाबाद पोलिसांनी इतर टोळ्यांना पकडण्यासाठी पथकेही तैनात केली आहेत.

अहवालानुसार, 20 फेब्रुवारी रोजी उन्नाव, यूपी येथील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली की, 17 फेब्रुवारी रोजी तो कानपूरला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी आनंद विहार रेल्वे स्टेशनवर आला होता. तिकीट न मिळाल्याने त्याने नोएडा सेक्टर-58 मधील आपल्या घरी परत जाण्याचा निर्णय घेतला. रेल्वे स्थानकातून बाहेर आल्यानंतर तो टॅक्सी शोधत असताना आरोपी सागरने त्या आपण त्याच दिशेने जात असल्याचे सांगून, उबेर किंवा इतर कोणतीही अधिकृत टॅक्सीपेक्षा कमी किमतीत पोहोचवण्याची ऑफर दिली.

त्यानंतर पिडीत व्यक्ती सागरच्या टॅक्सीत बसला. थोडे अंतर गेल्यावर त्याने टॅक्सी चालकाला पाण्याची बाटली घ्यायची असल्याचे सांगून थांबण्यास सांगितले. त्यावर आरोपीने त्याला स्वतःकडील पाण्याची बाटली देऊ केली. ते पाणी पिताच तक्रारदार बेशुद्ध झाला. काही तासांनी शुद्धीवर आल्यावर तो नोएडाच्या सेक्टर-62 येथील लेबर चौकात होता. त्याच्याजवळील सामान, सोन्याची अंगठी, सोन्याचे लॉकेट, ॲपल आयफोन, 15 हजार रुपये आणि एक पर्स गायब असल्याचे आढळून आले. (हेही वाचा: Nishu Deshwal Died In Tractor Stunt: Youtuber निशू देशवालचा दुर्दैवी मृत्यू; ट्रॅक्टरवर स्टंट करणं जीवावर बेतलं)

त्यानंतर ताबडतोब त्याने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरु करून आरोपी कॅब चालक सागर याला अटक केली. चौकशीत त्याचा जहरखुरानी टोळीत सहभाग असल्याचे उघड झाले. तो अनेक दिवसांपासून टॅक्सी चालक असल्याचे भासवून प्रवाशांना लुटत होता. अशाप्रकारे कौशांबीच्या महाराजपूर बॉर्डर आणि आनंद विहार रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लुटणारी जहारखुरानी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे समोर आले आहे.