Nishu Deshwal Died In Tractor Stunt: Youtuber निशू देशवालचा दुर्दैवी मृत्यू; ट्रॅक्टरवर स्टंट करणं जीवावर बेतलं

तरुण पिढी प्रसिध्द होण्यासाठी नवनवीन स्टंट करत असतात, कधी मेट्रोमध्ये तर कधी रस्त्यावर वाहनांसोबत. दरम्यान रिल्स काढण्याच्या नादात तरुणाने आपला जीव गमावला आहे

Nishu Deshwal Died In Tractor Stunt: Youtuber निशू देशवालचा दुर्दैवी मृत्यू; ट्रॅक्टरवर स्टंट करणं जीवावर बेतलं
Nishu Deshwal Died PC Twitter

Nishu Deshwal Died In Tractor Stunt: तरुण पिढी प्रसिध्द होण्यासाठी नवनवीन स्टंट करत असतात, कधी मेट्रोमध्ये तर कधी रस्त्यावर वाहनांसोबत. दरम्यान रिल्स काढण्याच्या नादात तरुणाने आपला जीव गमावला आहे. ही घटना हरियाणा येथील पानीपत गावातील तामशाबाद येथे घडली आहे. सोशल मीडिया इंफ्लुएसर नीशू देशवालचा ट्रॅक्टरसोबत स्टंट करत असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे, ट्रॅक्टर सोबत स्टंट करताना तो ट्रॅक्टरच्या खाली दबून गेल्याने मृत्यू झाला आहे. हेही वाचा- Instagram Influencer Salika Malik हिचा बाईक स्टंट सोशल मीडियावर व्हायरल,

मिळालेल्या माहितीनुसार, निशू देशवाल हा हरियाणातील रहिवासी होता. नीशूचे सोशल मीडियावर १४ लाख सब्सक्रायबर्स होते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह होता. यूट्यूबवर अनेक स्टंटबाजीचे व्हिडिओ होते. स्टंटबाजीचा स्टार म्हणून सोशल मीडियावर ओळख निर्माण झाली होती. पंरतु स्टंटबाजी करणं जीवाशी बेतलं आहे.या घटनेनंतर नीशूच्या गावात शोककळा पसरली आहे. स्टंट करताना अपघातात मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, स्टंट करण्यासाठी निशूने ट्रॅक्टरचे पुढील चाक वरती केले परंतु बॅलेन्स आणि क्लॅच जास्त दाबल्यामुळे ट्रॅक्टरचा पुढील भाग त्याच्या अंगावर पडला. यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.

पाहा अंगाला काटा आणणारा व्हिडिओ

स्टंटबाजी बघणाऱ्यांनी त्याच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ कॅमेरात कैद केले. या घटनेची माहिती पोलिसांना आणि कुटुंबियांना देण्यात आली. त्याच्या युट्यूब चॅनेलवर लाखो सब्सक्रायबर्स आहे. या घटनेनंतर नीशूच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना धक्काच बसला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Feb 29, 2024 12:31 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).