Parliament Session 2020: प्रचंड गदारोळात 2 कृषी विधेयकं राज्यसभेत मंजूर; कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले, 'शेतकरी हितासाठी MSP व्यवस्था राहणार कायम'
Rajya Sabha | (Photo Credits: ANI)

Farm Bills Approved In Rajya Sabha: शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) ही अत्यंत वादग्रस्त तीन कृषी विधेयके (Agriculture Bills) आज संसदेच्या राज्यसभा (Rajya Sabha) या वरिष्ठ सभागृहात मांडण्यात आली. त्यापैकी दोन विधेयके आज आवाजी मतदानाद्वारे राज्यसभेत मंजूर झाली. विरोधी पक्ष, शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेलेही काही पक्ष या विधेयकाच्या विरोधात आहेत. तरीही आवाजी मतदानाद्वारे हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. या वेळी प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभा सभापतींना कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करावे लागले.

शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी व कृषी सेवा करार ही दोन विधेयके राज्यसभेत मंजूर झाली खरी. परंतू, या वेळी राज्यसभेत गदारोळ पाहायला मिळाला. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली. (हेही वाचा, Parliament Session 2020: राज्यसभेत आव्हान, वादग्रस्त शेती विधेयके पारीत करण्यासाठी भाजपकडून संख्याबळासाठी जमवाजमव)

दरम्यान, राज्यसभेची आगोदर घोषीत करण्यात आलेली वेळ संपत आली. तेव्हा राज्यसभा अध्यक्षांनी सदनाची वेळ वाढवायची का असे विचारले असता सत्ताधारी पक्षांनी त्यास होकार दिला. मात्र, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आजाद यांनी त्यावर आक्षेप घेत बहुमताच्या जोरावर अशी वेळ वाढवता येणार नाही. त्याला विरोधी पक्षाचीही तेवढीच मान्यता असायला हवी. हे सरकार घाडीगडबडीने आणि बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर करत आहे असा आक्षेप घेतला. आजाद यांच्या मताला इतर पक्षांनीही पाठिंबा दिला आणि राज्यसभेत जोरदार गदारोळ माजला.

ट्विट

आक्रमक राज्यसभा खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. एक क्षण तर असा आला की, विरोधी पक्षाचे सदस्य सभापतींच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी करण्यात आली. सभापतींचा माईकही खेचण्याचा प्रकार झाला. काही काळ सदनात मार्शलना पाचारण करावे लागले. या वेळी कृषीमंत्री तोमर बोलत होते.