Parliament Budget Session 2022: 'देशात दोन भारत, एक गरिबांचा, दुसरा श्रीमंतांचा,  डबल A व्हेरीएंटही फैलावतोय', राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर हल्ला
Rahul Gandhi | (Photo Credit: ANI)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Parliament Budget Session 2022) राष्ट्रपतींच्या अभीभाषणावर अभार प्रदर्शन करताना काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) काहीसे आक्रमक पाहायला मिळाले. केंद्र सरकारच्या ध्येय धोरणांवर सडकून टीका करताना राहुल गांधी (Rahul Gandhi attacks Central Government) म्हणाले, देशात दोन भारत तयार झाले आहेत. एक आहे गरीबांचा भारत आणि दुसरा श्रीमंतांचा भारत. यासोबतच देशात 'डबल A' व्हेरीएंटही मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. प्रत्येक ठिकाणी अदानी आणि अंबानीच दिसत आहे. देशातली 3 कोटी युवकांचा रोजगार मोठ्या प्रमाणावर हरवला आहे. पाठीमागील 50 वर्षांमध्ये सर्वाधिक बेरोजगारी सध्याच्या काळात पाहायला मिळत आहे. देशातील युवा रोजगार मागत आहे, पण सरकारचे त्याकडे बिलकूल लक्ष नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.

केंद्र सरकारवर हल्ला चढवत राहुल गांधी म्हणाले, आपण मेड इंडिया, मेड इन इंडिया सारखे म्हणत राहात. मेड इन इंडिया आता शक्य नाही. आपल्या मेड इन इंडियाने देशाला बर्बाद केले. आपण छोट्या आणि मध्यम उद्योजकांना पाठींबा देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मेड इंन इंडिया संभव नाही. छोट्या आणि मध्यम उद्योजक रोजगार निर्मिती करु शकतात. आपण मेड इन इंडिया, स्टार्टअप इंडिया इत्यादी गोष्टींबाबत बोलत राहता. पण वास्तवात आपण केवळ बेरोजगारी वाढवत आहात. (हेही वाचा, Rahul Gandhi on Budget 2022: अर्थसंकल्पावर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले काँग्रेस नेते?)

ट्विट

ट्विट

राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, आपण या विचारात राहु नका की आपण जो गरीब भारत निर्माण करत आहात तो शांत राहील. आज भारताला दिसते आहे की, देशातील केवळ 100 श्रीमंत लोकांजवळ भारतातील 55 कोटी लोकांपेक्षा अधिक संपत्ती आहे. ही संपत्ती नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली आहे.